Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात

Ramdas athawale Car Accident News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाला आहे. साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv

Ramdas athawale Car Accident :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाला आहे. साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. आठवले यांच्या कारला साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला. समोर वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे आठवले यांची कार पुढच्या गाडीवर धडकली.

या अपघातात सुदैवाने रामदास आठवले आणि कुटुंब सुखरुप आहेत. रामदास आठवले यांच्या पत्नीला किरकोळ इजा झाली आहे. या अपघातानंतर खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाली आहे.

Ramdas Athawale
Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे पथक दाखल

अपघात कसा झाला?

रामदास आठवले हे साताऱ्यातील वाईमधून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका कार कंटेनरला धडकली. त्यानंतर ताफ्यातील एका कारने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर आठवले यांची कार ही समोरील गाडीला धडकली.

या अपघातात रामदास आठवले सुखरुप असून त्यांच्या पत्नीला किरकोळ इजा झाली आहे. या अपघातात वाहनाच्या पुढील बाजूते मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या कारने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

Ramdas Athawale
Akola Lok Sabha Constituency History: अकोल्यात कोण बाजी मारणार? या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

अपघातात आठवले यांच्या कारच्या इंजिनचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. आठवले यांच्याबरोबर त्यांची पत्नी सीमा आठवले आणि त्यांच्या सासूबाई ( सीमा यांच्या आई) होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com