नागपूर : अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनची चौकशी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या आरोपांनंतर आता राज्य गुप्तचार यंत्रणा ही चौकशी करणार आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या भूमिकेवर रवी राणा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन हे प्रकरण चोरीच्या दिशेने वळवण्सास सांगितले गेले. उद्धव ठाकरे यांनी आरती सिंग यांना फोन केल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी विधीमंडळात केला. या आरोपांबाबत चौकशी होऊन अहवाल राज्य गुप्तचर यंत्रणा देणार आहे, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात दिली आहे. (Latest Marathi News)
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर उत्तर देताना शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, राज्य गुप्तचर आयुक्तांना या सगळ्या गोष्टी कळवल्या जातील. येत्या पंधरा दिवसांच्या आत सविस्तर अहवाल मागवला जाईल. यामध्ये कुणाचा फोन आला का हे तपासलं जाईल, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.
उमेश कोल्हे यांची हत्या झाली कारण ते हिंदू विचारांच्या पोस्ट व्हायरल करत होते. त्यांना धमक्या देखील येत होत्या. याबाबत आम्ही पोलीस आयुक्त आरती सिंह यांना कल्पना दिली होती. त्यांची हत्या झाली पण उद्धव ठाकरे यांचा दबाव असल्याने ती केस चोरीमध्ये फिरवण्यात आली.
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि मविआच्या आदेशाचे पालन करत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी कधीच सोडले आहेत, अशी टीका देखील रवी राणा यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.