Nagpur News : महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात महिला आक्रमक; विधीमंडळ परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न

नागपुरातून मोठं वृत्त समोर येत आहे. नागपुरातील विधीमंडळाच्या परिसराच्या बाहेर एका महिलेने आज, शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
Nagpur News
Nagpur News Saam Tv
Published On

Nagpur News : नागपुरातून मोठं वृत्त समोर येत आहे. नागपुरातील विधीमंडळाच्या परिसराच्या बाहेर एका महिलेने आज, शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कायदा करावा, यासाठी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. महिलेच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. (Latest Marathi News)

Nagpur News
Mahavikas Aghadi: मविआमध्ये मोठी फूट पडणार? चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याने खळबळ

नागपूरच्या (Nagpur) विधीमंडळ परिसरात टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कायदा करावा, यासाठी महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी दुपारी २:३५ वाजण्याचा सुमारास कविता चव्हाण यांनी रॉकेल ओतले आहे. यावेळी कविता चव्हाण यांनी 'शिवाजी महाराज की जय' या आशयाच्या घोषणा देखील दिल्या.

विधीमंडळ परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांनी धावत जाऊन महिलेला आत्मदहनापासून रोखलं. त्यामुळे विधीमंडळ परिसरात मोठा अनर्थ टळला आहे. कविता चव्हाण या टायगर ग्रुपच्या सोलापूर शहराध्यक्ष आहेत. प्रत्येक अधिवेशनादरम्यान त्या अशा प्रकारच्या आंदोलन करून स्वत: कडे प्रशासनाचे व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधतात. २०१९ साली त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अशा प्रकारच्या आंदोलन विधानभवनाच्या गेटवर देखील केले होते.

Nagpur News
Army Truck Accident: भारतीय लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, 16 जवान शहीद

दरम्यान, कविता चव्हाण यांच्याकडून वारकऱ्यांवरील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विरोधातही कविता चव्हाण यांनी राग व्यक्त केला. कुणीही संताचा अपमान करत सुटले आहे, यावर सरकार काहीही करत नाही याचा राग व्यक्त करण्यासाठी देखील कविता चव्हाण यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतले. कविता चव्हाण या सोलापूरच्या रहिवाशी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com