Ulhasnagar News : ६ व्या मजल्यावरून उडी मारून वृद्धानं मृत्यूला कवटाळलं; कारण आलं समोर

सहाव्‍या मजल्‍यावरून उडी मारत वृद्धाची आत्महत्या
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv

उल्हासनगर : उल्हासनगर येथे एका वृद्धाने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार येथील गायकवाड पाडा येथे घडला आहे. (Live Marathi News)

Ulhasnagar News
Jalgaon News: दारू पिणाऱ्यांवर थर्टी फस्‍टच्‍या रात्री भरारी पथकाची नजर; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १३२७ गुन्‍हे

उल्हासनगर पाच स्तंभ उल्हासनगर (Ulhasnagar) ग्राम क्रमांक पाच येथे गायकवाड पाडा परिसरात असलेल्या जेपी सिमथनी या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे अमरजीत बच्चनदास बेदी यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घराच्या बाल्कनी मधून उडी घेतली. हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर कॉम्प्लेक्समधील नागरिकांनी बेदी यांना जखमी अवस्थेत मध्यवर्ती (Hospital) रुग्णालयात नेले.

रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच मृत्‍यू

बेदी यांना रुग्णालयात नेले असता (Doctor) डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले. ते अनेक दिवसांपासून वैफल्यग्रस्त होते. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com