Ulhasnagar News: धक्कादायक! डिक्लेरेशन फॉर्म भरून न आणल्याने शिक्षा; ८ ते १० विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून जबर मारहाण

पालकांच्या तक्रारीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत ढेरे यांनी सांगितले आहे.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaamtv
Published On

Ulhasnagar Crime: उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील उल्हासनगर कॅम क्रमांक पाच येथील न्यू इंग्लिश शाळेत आठ ते दहा विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

शाळेतून दिलेला डिक्लेरेशन फॉर्म भरून न आणल्याने शिक्षकांची विद्यार्थ्यांना ही शिक्षा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पालक संतप्त झाले असून त्यांनी हेललाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास धाव घेतली आहे. (Crime News In Marathi)

Ulhasnagar News
Nashik Crime News : दराेड्याच्या तयारीतील चाळीसगावची टाेळी काठे गल्ली सिग्नलनजीक शस्त्रासह जेरबंद

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी याच न्यू इंग्लिश शाळेत फी वाढी विरोधात एक आंदोलन झाले होते. यावेळी पोलीस, पालक ,आमदार गणपत गायकवाड आणि प्रिन्सिपल यांच्यात बोलणे होऊन मधला मार्ग काढला जाणार होता. मात्र काल शाळेकडून विद्यार्थ्यांना एक डिक्लेरेशन फॉर्म देण्यात आला होता.

तो फॉर्म आज भरून न आणल्यामुळे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये या चार ते पाच वर्ग शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना चांगलेच मारण्यात आल्याने विद्यार्थी भयग्रस्त झाले आहेत. चार ते पाच वर्ग शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना चांगलंच मारण्यात आल्याने विद्यार्थी भयग्रस्त झाले आहेत. आता हे विद्यार्थी उद्यापासून शाळेत जाणार नाही असं बोलत आहेत.

Ulhasnagar News
Ajit Pawar Banner In Dharashiv: उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादांच्या सासरवाडीत झळकले बॅनर, अजित पवारांसोबत शरद पवारांचाही फोटो

दरम्यान, कुठेतरी लहान मुलांच्या मनावर शिक्षकांविरोधात भय निर्माण झाल्याने पालकांनी शाळेच्या विरोधात हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल करून घेतली जात आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत ढेरे यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com