पंचनाम्याला येणारे अधिकारी विचारताहेत घरात पाणी आले हाेते का?

flood
flood
Published On

सांगली : पंचनाम्याला आलेले लाेक, अधिकारी विचारताहेत घरात पाणी आले हाेते का?, किचन कट्ट्यापर्यंत पाणी आले हाेते का? आम्ही गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत घरात थांबायचे हाेते का? असा प्रश्न उपस्थित करुन आम्हांला सानुग्रह अनुदान नकाे शंभर टक्के गावाचे स्थलांतर करा अशी मागणी अंकलखाेपचे ग्रामस्थ दिपक भागवत यांनी केली आहे. uddhav-thackreay-sangli-flood-affected-area-visit-ankalkhop-sml80

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे flood मोठ्या प्रमाणावर घरांचे, शेतीचे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे आज (साेमवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर विविध भागातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांपुढे मागण्या करणार असल्याचे सांगितले.

अंकलखाेपचे सरपंच अनिल विभुते म्हणाले एका बाजूला काेराेना आहे म्हणून घरात बसा आणि दूस-या बाजूला पूराचे पाणी घरात. या परिस्थितीत काय करावे हे ग्रामस्थांना समजत नाही. ते खूप भयभीत झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावातील शेतक-यांचे पीक कर्ज माफ करावे, गावात प्राथमिक आराेग्य केंद्र उभारावे, छाेट्या दुकानदारांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या आहेत.

सन २००५, २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर त्यात काेराेनामुळे आर्थिक दृष्ट्या गाव कमकुवत झाले आहे. शेतीसाठी १०० टक्के कर्जमाफी करावी, शेतक-यास वीज माफी करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. पंचनाम्याला आलेले लाेक अधिकारी विचारताहेत घरात पाणी आले हाेते का?, किचन कट्ट्यापर्यंत पाणी आले हाेते का? आम्ही गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत घरात थांबायचे हाेते का? असा प्रश्न उपस्थित करुन ग्रामस्थ दिपक भागवत म्हणाले सानुग्रह अनुदानासाठी आम्ही घरात थांबायचे हाेते याचा अर्थ त्यांच्या प्रश्नांतून निर्माण हाेत आहे.

flood
मुख्यमंत्र्यांबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ही ती वेळ नाही!

गतवेळेस आम्हांला मंत्री विश्वजीत कदम यांनी खूप मदत केली हाेती. आत्ता देखील ते कुटुंबातील सदस्य असल्यासारखी मदत करीत आहेत. सरकारने सानुग्रह अनुदानापेक्षा आमच्या गावाचे शंभर टक्के स्थलांतर करावे अशी ठाम मागणी भागवत यांनी केली आहे.

दरम्यान अंकलखाेप येथे ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांसह ग्रामस्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येण्याची वाट पहात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com