बाळासाहेबांची शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. २००४ मध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते, असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी दसरा मेळाव्यात केला. (Latest News)
दसऱ्या मेळाव्यात आलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वावर टीका केली. ठाकरेंचं हिंदुत्त्व हे दुबळेपणाचं आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी स्वीकारली. ज्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला? बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना दूर केलं त्यांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं. त्यामुळे गद्दार कोण आणि महागद्दार कोण जनता हुशार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचा गोळा घोटला तर चालेल का? गर्व से कहो हम काँग्रेस के साथ है, आज हेच चालू आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला. इतर आमदार आणि खासदारांनी त्यांची लोकप्रतिनिधीत्व गमावलं. तरीही देखील बाळासाहेबांनी आपल्या हिंदुत्वाचे विचार सोडले नाही. पण रक्तचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटलाय. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले
उद्धव ठाकरेंना २००४ सालापासून त्यांना ही इच्छा होती. पण जुगाड काही लागत नव्हता. उद्धव ठाकरे म्हणायचे की, मी बाळासाहेबांना शब्द दिलाय की, शिवसैनिकांना पालखीत बसवणार, त्यांना मुख्यमंत्री बनवणार, पण कोणाला? आम्ही विचार करत होतो. परंतु हे महाशय विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. सगळं सोडून दिलं. मागचं पुढचं सगळं दिलं. त्यानंतर म्हणाले मला कुठे व्हायचं मुख्यमंत्री, पण पवार साहेबांनी सांगितलं.
परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी पवार साहेबांकडे दोन माणसे पाठवली. विधानसभेची निवडणुकीचे निकाल लागताच ते सर्व दारे उघडी असल्याचे म्हणत होते. परंतु कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होतं. सगळ्यांना त्यांचा एक चेहरा दिसतोय. परंतु त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे भोळेपणाने जे तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावे. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातले पाणी पण हलू दिलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी कळू दिलं. त्यांनी आपल्यला समजू दिलं नाही. सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले.असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.