Uddhav Thackeray
Uddhav Thackerayyandex

Uddhav Thackeray: अबकी बार भाजपा तडीपार; उमरगामधून उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

Uddhav Thackeray: उमरगा येथील जनसंवाद यात्रेत नागरिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. अमित शाह यांनीच वचन मोडलं असून ते आता खोटं बोलत आहेत, असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Published on

Uddhav Thackeray In Umarga Jansawad Yatra:

तुळजाभवानी शप्पथ घेवून सांगतो, अमित शाह यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. परंतु आता अमित शाह खोटं बोलत आहेत. शाह तुम्ही दिलेलं वचन मोडलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर घरणेशाहीवरून टीका केली.(Latest News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद दौरा करत आहेत. त्यांनी आज धाराशीव, औसा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. त्यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना अतिम शाह यांनी घराणेशाहीवरून विरोधकांवर हल्लाबोल केला होता. 'सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा आदित्यला मुख्यमंत्री बनवायचे आहे, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असा टोला शाह यांनी लागला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित शाह यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी उमरगा येथील जनसंवाद यात्रेतून उत्तर दिलं. घराणेशाही विरूद्ध तुम्ही मला बोलता. जेव्हा तुम्ही मातोश्रीमध्ये येवून भेटला तेव्हा मी बाळासाहेबाचं पुत्र होतो हे माहीत नव्हतं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

संपूर्ण महाराष्ट्र आता चवताळलेला असून महाराष्ट्र आता निवडणुका व्हायची वाट बघतोय. भाजपला संपवून, गाडून, मूठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल. पण शिवसेना संपणार नाही. ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लावलेली आहेत. मोदी यांनी ‘मेरा परिवार‘ म्हटलंय, पण त्या परिवाराची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला. तर कोरोना काळात आपण जबाबदारी पार पडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेत झालेल्या फुटीवरूनही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने गद्दारी करुन शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरुन खाली पाडले. कारण मी लुटू देत नव्हतो. पण आता मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवायचा आहे. भाजपच्या आता लक्षात आलं आहे, महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालू शकत नाही. मोदी खोटा सिक्का आहेत, म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, अशी टीका उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर, जनसंवाद मेळाव्यातून शिवसैनिकांना घालणार भावनिक साद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com