मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँण्ड फार प्रभावी ठरला नाही. मात्र आता महापौरपदावरुन एकमेकांना साद घातली जातेय. भाजप आणि शिंदेसेनेतली धुसफूसही लपून राहिली नाही. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात त्यांनी नाव न घेता मोदी, शाहांवर हल्लाबोल केला. मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापा-यांचा गुलाम म्हणून जगणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच घेण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. तर या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय.
मनपा निकालानंतर प्रथमच ठाकरे बंधु एकाच व्यासपिठावर आले होते. यावेळी भाजप आणि एकनाथ शिंदेंचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘मुंबईवरचा शिवरायांचा भगवा उतरवून तुम्हाला काय मिळालं?’ असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय.
तर ‘आजची राजकीय परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत, हे बरंच झालं,’ असं म्हणत उद्विग्न झालेल्या राज ठाकरेंनी पक्ष बदल आणि घोडेबाजारावरुन भाजपवर निशाणा साधलाय.
मनसेला निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. कल्याण-डोंबिवलीत महापौरपद निवडणुकीत लवचिक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी शिंदे सेनेला पाठींबा दिलाय. तर उद्धव ठाकरेंनी आपली भाजप विरोधातील भूमिका अधिक कडवटपणे जाहीर केली आहे. आगामी काळात ठाकरे बंधूंचं राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.