Grampanchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (rajapur) ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार राजन साळवी यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे. आत्तापर्यंत दहा पैकी सात ग्रामपंचयतीवर साळवींच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आहे. (Breaking Marathi News)
राज्यात रविवारी विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. आज (साेमवार) एकेक ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर हाेऊ लागले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांत भाजपा, काही ठिकाणी एनसीपी तसेच काॅंग्रेसचे प्राबल्य दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटास रायगड जिल्ह्यात धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्यात त्यांच्या गटाने एका ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. (Maharashtra News)
राजापूर तालुका निकाल
सागवे - ठाकरे गट
देवाचे गोठणे - गाव पॅनल (बिनविरोध)
वडदहसोळ - ठाकरे गट (बिन विरोध)
आंगले - ठाकरे गट
भालावली - भाजप
केळवली -ठाकरे गट (बिनविरोध)
मूर -ठाकरे गट (बिनविरोध)
राजवाडी - गाव पॅनल
मोगरे - ठाकरे गट (बिनविरोध)
कोंडये तर्फे सौदळ - ठाकरे गट
गुहागर तालुका निकाल
अंजनवेल - ठाकरे गट
वेलदूर - ठाकरे गट
वेळंब -गाव पॅनल (बिनविरोध)
परचुरी - गाव पॅनल (बिनविरोध)
छिंद्रावळे - गाव पॅनल
जिल्हा - रत्नागिरी
एकुण ग्रामपंचायत -51
मतदान झालेल्या ग्रामपंचायती - 36
बिनविरोध ग्रामपंचायती -15
आत्तापर्यंत जाहीर झालेले निकाल
शिवसेना उद्धव ठाकरे गट - 12
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट - 05
भाजप - 00
राष्ट्रवादी - 1
काँग्रेस - 00
इतर - 06
सिंधुदुर्गात भाजपचे वर्चस्व
सिंधुदुर्गातील एकूण चार ग्रामपंचायत निवडणुकीपैकी तीन निकाल हाती आले आहेत. त्यातील दोन ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. एका ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील पाटये पुनर्वसन ग्रामपंचायत व देवगड तालुक्यातील मळेगाव ग्रामपंचायत भाजपकडे तर देवगड तालुक्यातील पडवणे ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.