Uddhav Thackeray : साहेबांना परत मुख्यमंत्री बनवायचंय, शिवसैनिकांचा ध्यास आहे; सांगलीत झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर्स

Uddhav Thackeray Birthday : शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री निवास्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे.
साहेबांना परत मुख्यमंत्री बनवायचंय, शिवसैनिकांचा ध्यास आहे; सांगलीत झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर्स
Uddhav Thackeray BirthdaySaam TV
Published On

शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री निवास्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तामिळनाडू शिवसेना UBT पक्षाकडून देखील वाढदिवसाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. दुसरीकडे शिव सहकार सेनेकडून वाढदिवसानिमित्त खास केक बनवण्यात आलाय.

साहेबांना परत मुख्यमंत्री बनवायचंय, शिवसैनिकांचा ध्यास आहे; सांगलीत झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर्स
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठं खिंडार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं

या केकवर "साहेब, परत मुख्यमंत्री (Chief Minister) बनवायचं, महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा ध्यास आहे", अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आलाय. त्यामुळे हा केक सध्या चर्चेचा विषय ठरतोय. भाजपची साथ सोडल्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. इतकंच नाही तर, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली.

विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर कोरोना काळातही त्यांनी महाराष्ट्र चांगलाच सांभाळला. यामुळे कमी कालावधीतच उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले. मात्र, त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीची सत्ता स्थापन केली. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचंय असा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिक नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. सांगली शहरातही उद्धव ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण शहरभरात बॅनरबाजी केली आहे. या बॅनर्सची संपूर्ण शहरभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

साहेबांना परत मुख्यमंत्री बनवायचंय, शिवसैनिकांचा ध्यास आहे; सांगलीत झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर्स
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू शिलेदार शरद पवार गटात प्रवेश करणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com