Maharashtra Politics: गद्दारांशी युती नको, ठाकरेंचं फर्मान, ठाकरे-शिंदेसेना युतीवरून वादंग

Kankavli Election Strategy: कणकवलीतील ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या युतीवरून उद्धव ठाकरेंनी नवं फर्मान सोडलयं... त्यामुळे राणेंना शह देण्यासाठी कट्टर वैरी एकत्र येणार का? ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नेमके काय आदेश दिलेत?
Uddhav Thackeray issues a strict directive amid growing talks of a Thackeray–Shinde Sena alliance in Kankavli.
Uddhav Thackeray issues a strict directive amid growing talks of a Thackeray–Shinde Sena alliance in Kankavli.Saam Tv
Published On

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि ठाकरेसेना एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलीय. ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक राणेंना रोखण्य़ासाठी कोकणात ही रणनीती आखली जातेय. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकाही घेतल्या. भाजप आमदार नितेश राणेंना रोखण्यासाठी सुरू केलेल्या य़ा सगळ्या खटाटोपाला ब्रेक लागणार आहे.

कणकवलीतील राजकीय समीकरणावर उद्धव ठाकरेंची स्थानिक नेत्यांसोबत गुप्त बैठक झाली....भाजपाला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सांगितलं...संदेश पारकर, वैभव नाईक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शहर विकास आघाडीचं महत्त्व ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न केला... मात्र उद्धव ठाकरेंनी गद्दारांशी युती नको, असा फर्मान गुप्त बैठकीत सोडल्य़ाची माहिती सूत्रांनी दिलीय...

तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदेसेना सहभागी होत असेल तर आमचा त्याला विरोध नाही, असं विधान ठाकरेसेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी केलंय. तर कोणत्याही परिस्थिती गद्दारांशी युती नको असं ठाकरेंनी ठणकावून सांगितल्याचं माजी खासदार विनायक राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरेसेनेतील अंतर्गत धुसफूसही आता चव्हाट्यावर आलीय...

कणकवलीत शिंदेसेना आणि ठाकरेसेनेच्या कोणत्या नेते भाजपला शह देण्यासाठी शहर विकास आघाडीच्या नव्य़ा राजकीय समीकरणाला समर्थन देतायत पाहूयात....

दोन्ही शिवसेनेच्या युतीसाठी आग्रही - HDR

ठाकरेसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष

संदेश पारकर यांच्यासह शिंदेसेनेचे राजन तेलींना कणकवलीत युतीसाठी सकारात्मक आहेत....

ठाकरेसेनेचे नेते उद्धव ठाकरेंचे फर्मान मानणार की भाजपच्या राणेंना शह देण्यासाठी शिंदेसेनेशी हातमिळवणी करणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com