Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Raj Thackeray's stand: राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी नवा दावा केलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय? असा सवाल उपस्थित केला जातोय... उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? ठाकरे बंधूंची युती कधी होणार?
Uddhav Thackeray hints at direct talks with Raj Thackeray over alliance before upcoming civic elections.
Uddhav Thackeray hints at direct talks with Raj Thackeray over alliance before upcoming civic elections.Saam Tv
Published On

शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीबाबत नवा दावा केलाय. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा युतीबाबत स्पष्टीकरण दिलयं. युतीबाबत प्रॉब्लेम कुणाला आहेत, असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान युतीसाठी राज ठाकरेंशी थेट चर्चा करणार असल्याचे संकेतही उद्धव ठाकरेंनी दिलेत. तसचं आम्ही चोरुनमारुन भेटणाऱ्यातले नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय...

उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे ठाकरे बंधूंची राजकीय युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे वारंवार राज ठाकरे आणि आम्ही एकत्र आल्याचं सांगत आहेत. त्यामुळे मनसे आणि उबाठा महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत मिळतायत. मात्र दोन्ही नेते एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येतील याची काहीच गॅरंटी नाहीये, त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलंय. अशातच पहिल्यादा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबतच्या युतीबाबतही भाष्य केलयं. तर काँग्रेस नेत्यांनीही स्थानिक परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलयं.

दरम्यान उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असले तरी राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध पवित्रा घेण्यात आलाय. मिरारोडमधील सभेनंतर मराठीचा मुद्दा राज ठाकरे पालिका निवडणुकीत आक्रमकतेनं मांडणार हे निश्चित... त्यामुळे ठाकरे बंधू निवडणुकीपूर्वी युतीचा निर्णय घेतात का? ठाकरे बंधूंच्या युतीनं महाविकास आघाडीचं काय होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com