Uddhav Thackeray : मुख्यमंत्री गुजरातच्या लोकांची हुजरेगिरी करताहेत; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सणसणीत टोला

Uddhav Thackeray Latest News : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी तानाजी सावंत यांच्यावरही नाव न घेता टीका केली.
Maharashtra Politics
Eknath Shinde vs Uddhav ThackeraySaam tv
Published On

सांगेला : उद्धव ठाकरेंनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरेंनी सांगोला येथे झालेल्या भाषणात महायुती आणि एकनाथ शिंदे यांना सणसणीत टोला लगावला. मुख्यमंत्री गुजराती लोकांची लोकांची हुजरेगिरी करत असल्याची टोकाची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी गुवाहाटीचे रेल्वेचे तिकीट बुक करा.

त्यांना तिकडे काय झाडी, काय डोंगर बघूद्या

त्यांनी आयुष्याची राखरांगोळी केली.

Maharashtra Politics
CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

गद्दारांना गाडायला आलोय, त्यांचा माज उतरवायला आलो आहे.

त्यांना महाराष्ट्र कधीही क्षमा करत नाही.

त्यांनी रायगडाचे टकमक टोक बघितलं नाही, तिथे कडेलोट करतील

Maharashtra Politics
Sharad Pawar : सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले, VIDEO

गेल्यावेळी दिपक साळुंखे यांना उमेदवारी देणार होतो. त्यावेळी मध्येच धरण फोडणारा खेकडा भेटला.

तुमच्यासाठी लढणारा सैनिक पाहिजे. मशाल पेटल्यानंतर सगळं गरम होईल. गद्दारीचा वार आईच्या कुशीवर केला आहे.

मराठवाडा विदर्भातील शेतकरी हवालदिल आहे. 370 कलम काढलं तरी शेतकऱ्यांना शेत मालाचा भाव वाढला नाही.

अमित शहा डोक्याला तेल लावा. 370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

काश्मीर पंडितांना शिवसेना प्रमुखांनी आश्रय दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी किती काश्मीरी पंडितांना घरी घेऊन गेल्याचे सांगा. काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन मी राम मंदिरात गेलो होतो.

Maharashtra Politics
Uddhav Thackeray : मला भावी मुख्यमंत्री म्हणतात, पण...; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

आम्ही पाच वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहे. तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे त्यापूर्वी त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे.

मुलींप्रमाणेच आता यापुढे मुलांना देखील मोफत शिक्षण देणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती दिली.

दहा रूपयांना शिवभोजन दिले.

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच मुस्लिम विरोधी भूमिका घेतली नाही. शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन पुढे जातोय. एकही विचार सोडला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com