उद्धव ठाकरेंचे माजी सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर

प्राप्तिकर विभागाच्या बेनामी सेक्शनमधून एक प्रकरण उघडकीस आले आहे.
उद्धव ठाकरेंचे माजी सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर
उद्धव ठाकरेंचे माजी सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवरSaam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांचे सल्लागार आणि माजी अधिकारी अजोय मेहता (Ajoy Mehta) सध्या आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आहेत. बेनामी प्रॉपर्टीअंतर्गत अजोय मेहता यांच्या नरिमन पॉईंट येतील फ्लॅटशी संबंधित डीलचा आयकर विभाग तपास करत आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अजोय मेहता यांना महारेराचे अध्यक्षपदी रुजू झाले होते. प्राप्तिकर विभागाच्या बेनामी सेक्शनमधून एक प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यामध्ये नरिमन पॉईंटमध्ये प्रॉपर्टी डील करण्यात आली होती. ही डील शेल कंपनी आणि सेवानिवृत्त अधिकारी यांच्यात झाली. (Income Tax department keeping close tab on Ajoy Mehta)

उद्धव ठाकरेंचे माजी सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर
माढ्याच्या सब जेल मधुन चार सराईत आरोपींनी ठोकली धूम !

मिळालेल्या माहितीनुसार अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट परिसरातील फ्लॅट खरेदी केला होता. तो शेल कंपनी अनामित्र प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आला. या कंपनीचे दोन भागधारक आहेत, जे मुंबईतील एका चाळीत राहतात. ही कंपनी केवळ हा करार करण्यासाठी तयार केली गेली. या संशयाने प्राप्तिकर विभागाने तपास सुरु केला. या कंपनीच्या ताळेबंदीत बरीच तफावत आहेत, तसेच भागधारक देखील नॉन-फाइलर असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे प्राप्तिकर विभागाचा संशय अधिक बळावला आहे.

अजय मेहता यांनी मागील वर्षी हा 1076 चौरस फूट फ्लॅट 5.33 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला. २००९ साली ही मालमत्ता अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडे होती, असे सांगण्यात आले होते, तेव्हा त्याचे मूल्य चार कोटी रुपये इतके होते. दरम्यान भागधारकांचे उत्पन्न कमी असल्याचे अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीचा भागधारक कामेश नथुनी सिंग, ज्याचे 99 टक्के समभाग आहेत ते नॉन-फाइलर आहेत. त्याचा पत्ता ओबेरॉय मॉलजवळ देण्यात आला आहे, तर दुसरा भागधारक दीपेश रवींद्र सिंह आहे, ज्याने फक्त एकच रिटर्न भरला आहे, ज्यामध्ये उत्पन्न 1,71,002 रुपये देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि अशा उच्च किंमतीची संपत्ती ठेवणे त्यांना अवघड आहे, अशा लोकांना कंपनीचे भागधारक दाखविण्यात आले आहे.

या संपूर्ण वादावर अजय मेहता एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भुमिका मांडली आहे. मला मालमत्तेचा मालक ओळखण्याचे कोणतेही कारण नव्हते. हा कायदेशीर करार होता आणि तो योग्य मार्गाने करण्यात आला होता. तसेच या करारावेळी मी बाजारभावाप्रमाणे पैसे दिले. मग हे सर्व कोठून सुरु झाले ते मला माहित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com