Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची मातोश्रीवर पुन्हा भेट ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी?

Inside Details Of Thackeray Brothers: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दिवसेंदिवस जवळीक वाढत चाललीय. रविवारी मातोश्रीवर काय घडलं ?
Uddhav Thackeray and Raj Thackeray during their 40-minute closed-door meeting at Matoshree, Mumbai.
Uddhav Thackeray and Raj Thackeray during their 40-minute closed-door meeting at Matoshree, Mumbai.Saam Tv
Published On

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या याचं घोषणेनंतर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीच्या घडामोंडींना वेग आलाय... त्यात राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायाला मिळाले... निमित्त होतं, खासदार संजय राऊतांच्या नातवाचं बारसं... हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचं एकमत झाल्यानंतर माध्यमात दोन्ही भावांच्या राजकीय युतीबाबत राऊतांनी अनेकदा संकेत दिलेत.. अशातच राऊतांच्या नातवाच्या बारसाला दोन्ही भावांची अनऔपचारिक भेट चांगलीच रंगली.. यानंतर राऊतांच्या निवासस्थानावरून निघालेले ठाकरे बंधू कुठल्याच नियोजनाशिवाय थेट मातोश्रीवर पोहचले... विशेष म्हणजे यावेळी दोन्ही पक्षाचा कुठलाच नेता ठाकरे बंधूंसोबत नव्हता, अशीही माहिती सूत्रांनी दिलीय...

दोन्ही भावांनी मातोश्रीवरील भेटीसंदर्भात गुप्तता पाळली. ठाकरे बंधूममध्ये मातोश्रीवर बंद दाराआड 40 मिनट चर्चा झाली.. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता..तसचं मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नाशिक, संभाजी नगर, पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी युती होण्याची शक्यता वर्तवली जातेय...

गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंची झालेली ही पाचवी भेट आहे.. त्यातच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलीय.. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक राजकीय युतीचे संकेत देतेय.. राज ठाकरेंनी अचानक केलेली मातोश्रीवारी चर्चेचा विषय ठरलाय..ठाकरे बंधूंची युती होणार,असे राजकीय संकेत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा दिलेत...मात्र ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा कधी करणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com