Satara News : पवारांशी सलगी करणा-यांची आता मंत्रीपदासाठी निष्ठेची नाटके; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टाेमणा

त्यांच्या बडबडीला आमच्या लेखी आणि जनतेच्या लेखी काडीमात्र किंमत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशी टीका उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर केली आहे.
ajit pawar, udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
ajit pawar, udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political newssaam tv

Satara News : निष्ठा दाखवायला लागत नाहीत. त्या आपोआप प्रदर्शित होत असतात. तुम्ही भाजपात असताना गेली सुमारे अडीच वर्षे टिमकी मात्र सदैव कोणाची वाजवत होता हे जनतेला (अजित पवारांचा नामाेल्लेख टाळत) माहिती आहे. आता विस्तार असल्याने यांची निष्ठेची नाटके सुरु झाली आहेत अशी टीका खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर केली आहे.

उदयनराजे म्हणाले आम्ही भारतीय जनता पार्टीत (bjp) ज्यावेळी जाणार होतो याची कुणकुण लागताच यांनी भाजपाला जवळ केले. त्यामुळेच आम्ही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय लांबवला. ते भाजपात गेले म्हणून नंतर आम्ही गेलो असा ते अर्थ काढत असतील तर ताे चुकीचा आहे. कोणी कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

ajit pawar, udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
Satara News : शिवाजीराजे भाेसलेंच्या स्मृतीप्रित्यर्थ साताऱ्यात रविवारपासून राज्य बॅडमिंटन स्पर्धा

त्यांच्या नंतर अनेकांनी भाजपा प्रवेश केला हे सर्व प्रवेश यांच्यामुळे झाले तसेच प्रसिध्द दादांनी (ajit pawar) देखिल भाजपा बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे भाजपात गेले म्हणून हे सर्व घडले असे देखिल ते आता बडबडतील. (Maharashtra News)

ajit pawar, udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
Satara News : कुरतडलेली दाढी, भुरकट मिशांना पीळ देण्यापेक्षा... मिठ्या, पप्प्यावर राजेंचे शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

त्यांच्या बडबडीला आमच्या लेखी आणि जनतेच्या लेखी काडीमात्र किंमत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशी टीका उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर केली आहे.

पुढं उदयनराजे म्हणाले निष्ठा दाखवायला लागत नाहीत. त्या आपोआप प्रदर्शित होत असतात. तुम्ही भाजपात असताना गेली सुमारे अडीच वर्षे टिमकी मात्र सदैव कोणाची वाजवत होता हे जनतेला (अजित पवारांचा नामाेल्लेख टाळत) माहिती आहे. आता विस्तार असल्याने, यांची निष्ठेची नाटके सुरु झाली आहेत असा टोलाही लगावला आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar, udayanraje bhosale, shivendraraje bhosale, satara, satara political news
Pandharpur Corridor : एकच जिद्द कॉरिडॉर रद्द; पंढरपूरात महामाेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com