ऐकलंत... महायुतीत स्वबळाचा नारा देणाऱ्या नेत्यांविरोधात मंत्री उदय सामंतांनी ही टीका केलीय...
चिपळुणमध्ये शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.. याचं बैठकीत मंत्री उदय सामंतांनी स्वबळाचा नारा देऊन शिंदेंसेनेला डिवचणाऱ्या मित्रपक्षांतील नेत्यांना चांगलाच इशारा दिलाय...
सर्वच पक्षाचे नेते आपापल्या मतदारसंघात स्थानिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करतायत.. अशातच चिपळूणमध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयार करतायत.. त्यात दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे चिपुळणचे आमदार शेखर निकम यांनीही महिन्याभरापूर्वी स्वबळाचा नारा दिला होता..दरम्याम स्थानिक स्तरावरील नेत्यांच्या विधानांना गंभीर्यानं घेण्याची गरज नाही, महायुती म्हणून एकत्र आहोत, असं विधान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांनी केलयं...
कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांमध्ये कोकणातील एकूण 21 मतदारसंघ आहेत... त्यातील 8 जागांवर शिंदे गट, 7 जागांवर भाजप आणि 2 जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रत्येकी एका जागांवर ठाकरेसेनेचा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी झालाय....
विधानसभेला मिळालेलं यश स्थानिक निवडणुकीतही टिकवण्यासाठी महायुतीत संघर्ष असणार आहे. त्यातच ठाणे, नाशिक, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात महायुतीतील पक्षांनी आपली ताकद आजमावयाला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीतील पक्ष स्वबळाचा नारा देतायत...स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतला अंतर्गंत कलह अनेक ठिकाणी उफाळून येत आहे. कोकणात शिंदे सेनेची ताकद आहे. त्यामुळेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार धनुष्यबाण खरच मित्रापक्षांवरच चालणार का? महायुतीतील पक्ष आमनेसामने उभे राहिल्यास त्याचा परीणाम सरकारवर कसा होणार हे पाहणे महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.