Ambernath : अंबरनाथमध्ये उल्हास नदीत दोन तरुण बुडाले, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Ulhas River News : नदीपात्राला खोली असून पाण्याचा अंदाज न आल्याने उल्हास नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही तरुण पवई हिरानंदानीमध्ये राहणारे होते.
Ulhas River
Ulhas River Saam Tv News
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Two young drowned in Ulhas river : अंबरनाथमध्ये उल्हास नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शांतीसागर रिसॉर्टच्या मागे वसंत बंधाऱ्यावर हे दोन तरुण बुडाले आहेत. दोन्ही तरूणाचे मृतदेह अग्निशमन दलाने काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण पवई हिरानंदानीमध्ये राहणारे आहेत.

विवेक तिवारी आणि विनय शहा अशी या दोघांची नावं असून ते अनुक्रमे १८ आणि १७ वर्षांचे आहेत. विक्रोळी येथील पार्क साईट स्वामीनारायण नगर येथे राहणारे हे दोघे मित्रांसह पिकनिकसाठी अंबरनाथच्या वसत गावाजवळील उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर आले होते. तिथे उल्हास नदीत पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले.

Ulhas River
Ulhas River: ठाणे अन् रायगडची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णींचा विळखा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने तिथे धाव घेत या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरणं धोकादायक असल्याची बाब समोर आली असून त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतं आहे.

Ulhas River
Palghar River: पालघर जिल्ह्यातून कोणत्या प्रमुख नद्या वाहतात?

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे नदी, तलावात पोहायला जाण्याकडे तरूणाईचा कल जास्त वाढला आहे. पण पोहयाला जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. नदीत जास्त खोलवर जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये उल्हास नदीत दोन तरूणाचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरूण बुडाले आहेत. उल्हास नदीतमध्ये अशा घटना याआधीही झाल्या आहेत, पण प्रशासनकडून कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याचे बोलले जात आहे.

Ulhas River
Worlds Longest River: जाणून घ्या जगातील सर्वात लांब नदी कोणती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com