Crime : चाकूचा वार करून अंगठा तोडला; पावणेदोन लाखांना व्यापा-याला लुटलं

पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
crime news , amravati, chandur railway
crime news , amravati, chandur railwaySaamTv

Latur News : लातूर (Latur) शहरात एका व्यापाऱ्यावर हल्ला करुन त्याच्याकडून लाखाे रुपये तसेच माेबाईलची लूट करण्यात आली. या घटनेत चाेरट्यांनी व्यापा-यावर चाकूचा वार करून त्याचा अंगठा तोडला. यामुळे व्यापा-यास उपचारार्थ रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. पाेलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Latur Latest Marathi News)

लातूरात दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला केल्याची घटना समाेर आली आहे. हल्लोखोरांनी चाकूचा वार करून व्यापाऱ्याचा अंगठा तोडला. तसेच एक लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज पळवून नेला.

crime news , amravati, chandur railway
पुणे नवरात्रौ महोत्सव २०२२ : प्रमुख मान्यवरांच्या मांदियाळीत उत्सव रंगणार, वाचा सविस्तर

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली. मदन गंगाधरराव बीदरकर (रा. वैभव नगर, लातूर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

बीदरकर यांनी दिलेल्या तक्रारीत गांधी मार्केट येथील दुकान बंद करून रात्री साडे आठ वाजता दुचाकीवरुन घराकडे परत जाताना हा हल्ला झाला. उड्डाणपुलावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी हाक मारली. पाठीमागे वळून पाहिले असता एकाने दुचाकीला लाथ मारली आणि त्यांच्या जवळील पैश्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

crime news , amravati, chandur railway
Chandur Railway : मुलीला पळवून नेणा-या नईम खान खून प्रकरणी चाैघे अटकेत

त्यांना प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी चाकूने हातावर वार केला. यामध्ये अंगठा तुटला. यानंतर ते पैशाची बॅग आणि मोबाईल घेऊन पळाले असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञांताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

crime news , amravati, chandur railway
Solapur News : शिक्षिकेशी लगट, माजी महापाैरांच्या आली अंगलट; गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com