Breaking News : साताऱ्याचे युवक समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू

ganpatipule sea
ganpatipule sea
Published On

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात पाेहण्यासाठी आलेले पर्यटक बुडाल्याची घटना आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास घडली. बुडालेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित युवक सातारा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती उपल्बध झाली आहे.

ganpatipule sea
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

गणपतीपुळेचा समुद्र ganpatipule sea नेहमीच पर्यटकांना आकर्षित करीत असताे. येथे आलेल्या युवकांना आज समुद्रात पोहण्याचा मोह अंगलट आला. दुपारच्या सुमारास दाेन जण समुद्रात बुडाल्याने एकच गाेंधळ उडाला.

युवक बुडल्याचा गाेंधळ सुरु झाल्याने स्थानिकांनी समुद्राकडे मदतीसाठी धाव घेतली. बुडालेले युवक हे साताऱ्याचे असल्याचे समजते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घडली घटना असावी असे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेत दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे तर एकाला वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित युवकांची नावे स्थानिकांना अद्याप समजू शकलेली नाहीत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com