मुंबई महानगरपालिकेच्या 2 तुकड्या रायगड कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना

मुंबई महानगरपालिकेची 2 पथके रायगडच्या आणि कोल्हापूरच्या दिशेने मदतीसाठी रवाना करण्यात आली आहेत.
 मुंबई महानगरपालिकेच्या 2 तुकड्या रायगड कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना
मुंबई महानगरपालिकेच्या 2 तुकड्या रायगड कोल्हापूरकडे मदतीसाठी रवानासुमित सावंत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्य करत असतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची 2 पथके रायगडच्या आणि कोल्हापूरच्या दिशेने मदतीसाठी रवाना करण्यात आली आहेत. Two teams of Mumbai Municipal Corporation have been sent to Raigad and Kolhapur for help

रायगड व कोल्हापूरला पाठवलेल्या पथकांचे नियोजन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(Municipal Commissioner) (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी हे करणार येणार आहेत.तसेच पालिकेचे एक पथक रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत करण्यासाठी रवाना केले आहे. तसेच इथे 2 वैद्यकीय पथके 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा(Medical laboratory) घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे.

याबरोबरच वैद्यकीयMedicalविषयक बाबींचे व्यवस्थापन Management करण्यासाठीचे 1 पथक महानगरपालिकेतर्फे पाठविले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक श्री. महेश नार्वेकर हे करणार आहेत.

 मुंबई महानगरपालिकेच्या 2 तुकड्या रायगड कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना
कोणत्याच घटकाला वाऱ्यावरती सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे पुरग्रस्तांना आश्वासन!

कोल्हापूर(Kolhapur) येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेची आणखी एक पथक आज कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत 'रिसायकल मशीन' आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठविण्यात आली आहे.

मागील महापूरामध्ये म्हणजेच 2019 मध्ये कोल्हापुरात याच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी मदतीकरीता आले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com