कोणत्याच घटकाला वाऱ्यावरती सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे पुरग्रस्तांना आश्वासन!

ज्या ज्या भागाचे नुकसान झालं आहे त्या सर्व भागातील नागरिकांना सर्वोतोपरी मदत हे सरकार करणार आहे. तसेच नुकसान झालेल्या एकाही घटकाला वाऱ्यावरती सोडणार नसल्याचही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं.
 कोणत्याच घटकाला वाऱ्यावरती सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे पुरग्रस्तांना आश्वासन!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणचा पाहाणी दौरा केल्यांनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या ज्या भागाचे नुकसान झालं आहे त्या सर्व भागातील नागरिकांना सर्वोतोपरी मदत सरकार करणार आहे. तसेच नुकसान झालेल्या एकाही घटकाला वाऱ्यावरती सोडणार नसल्याचही आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.(The government will provide maximum assistance to the citizens of all the affected areas)

कालचा तळीये दौरा करुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर Chiplun tour आले होते यावेळी त्यांनी चिपळूनमधील मुख्य बाजारपेठेतून पाहाणी केली. तेथील दुकानदार व्यावसायीकांच्या भेटीही घेतल्या. हा दौरा संपवून मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध विषयावरती भाष्य केले.

पिढ्यांनपिढ्या वसलेल्या गावांमधे दरडी पडत आहेत, आत्ता जो पाऊस आपण अनूभवत आहोत हा भयानक आहे. तसेच आत्ता मी मदतीची घोषणा करणार नाही मात्र तातडीची मदत पाठविण्याचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचही मुख्यंमंत्र्यांनी यावेळी सांगितल.

उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा...

दरम्यान सांगली कोल्हापूरमध्येही(Sangali KOlhapur Flood) पुराच पाणी धोक्याची पातळी ओलांडून गेलं आहे त्यामुळे तेथील भागाचाही आपण जमल्यास उद्याच दौरा करणार असून सर्व राज्यातील पुरग्रस्त भागांसाठी एकत्रित मदतीची घोषणा करणार आहे.(Will announce joint assistance for flooded areas) आत्ता केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल असंही मुख्यमंत्री उद्धवठाकरे म्हणाले. भरपाई नव्हे तर व्यापाऱ्यांना पुन्हा आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करणार असल्याच मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राकडून मदत होतेय

केंद्र सरकारकडून(central govermet) राज्याला योग्य ती मदत मिळत आहे माझे पंतप्रधान,(PM) गृहमंत्री,Homeminister संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झाले आहे. एनडीआरएफ, NDRF लष्कर, हवाई दलाच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करताहेत. मात्र वारंवार येणाऱ्या पुरस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेणार आहोत असही मुख्यमंत्री म्हणाले.

 कोणत्याच घटकाला वाऱ्यावरती सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे पुरग्रस्तांना आश्वासन!
आम्हाला वाचवा,आमची मदत करा; पुरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो

पुराच्या पाण्याचे व्यवस्थाप सरकार करणार

ज्या पध्दतीने पुराच पाणी अचानक आणि वारंवार शहरांमध्ये येत आहे या धर्तीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी तसेच असं पुन्हा घडू नये म्हणून पुराच्या पाण्याच व्यवस्थापण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व व्यवस्थापण सरकार करेल असही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

तातडीची वैद्यकीय मदत.

आत्ता ज्या भागाची पाहाणी केली तेथील लोकांना घालण्यासाठी कपडेसुध्दा नाहीत याच पार्श्वभूमीवर आत्ता चिपळून भागाला तातडीची मदत पाठविण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवाय या भागात पशू वैद्यकीय पथकेVeterinary squads पाठविण्याचा निर्णयही घेतला असल्याच मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com