चाेरट्यांचा दारुवर डल्ला; गोडाऊनसह, बिअरबार- परमीट रुम फाेडलं

या चोरी प्रकरणी पाेलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
latur , crime news
latur , crime news saam tv
Published On

Latur News : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील लातूररोड येथील एक परमिट रुम बिअरबार फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांची एकूण दाेन लाख पाच हजार 141 रुपयांची दारू पळवली आहे. चाकूर पोलीस (police) ठाण्यात या चोरी प्रकरणी देवेंद्र किशनराव टोम्पे यांनी तक्रार केली आहे.

लातूररोड येथे टाेम्पे यांचा आकाश बार ॲण्ड रेस्टॉरंट नावाचा बार आहे. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच गोडाऊनही फोडले. चाेरट्यांनी विविध कंपन्यांची दारु असलेले बॉक्स चोरुन नेले.

या बारचे मालक देवेंद्र किशनराव टोम्पे यांनी चाकूर पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी परमिट रुम बिअर बारमधील विविध कंपन्यांची एकूण दाेन लाख पाच हजार 141 रुपयांची दारू पळवली आहे असे नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

latur , crime news
'मला भाजपात घ्या, एनसीपीचा माेठा नेता लागलाय आमच्या मागं' (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com