'मला भाजपात घ्या, एनसीपीचा माेठा नेता लागलाय आमच्या मागं' (पाहा व्हिडिओ)

या आव्हानास रामराजे काय प्रत्युत्तर देणार याकडं सा-या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे.
ranjitsinh naik nimbalkar , ramraje naik nimbalkar, satara , phaltan
ranjitsinh naik nimbalkar , ramraje naik nimbalkar, satara , phaltansaam tv

Ranjitsinh Naik Nimbalkar : रामराजे हिंम्मत असेल तर माझ्या विरोधात लोकसभेला किंवा गोरेंच्या विरोधात विधान सभेला उभं राहुन दाखवा; बघू "किस मे कितना है दम" असं आव्हान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांना दिलं आहे. या आव्हानास रामराजे काय प्रत्युत्तर देणार याकडं सा-या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. (Satara Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरावड्याचं आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने फलटण शहरात संवाद मेळाव्याचं आयोजन भाजपाच्या वतीने करण्यात आलं होतं. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुफान फटकेबाजी करत रामराजेंवर जोरदार हल्ला चढवला रामराजे हिंम्मत असेल तर माझ्या विरोधात लोकसभेला किंवा गोरेंच्या विरोधात विधान सभेला उभं राहुन दाखवा; बघू "किस मे कितना है दम" असे थेट आव्हान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंना या वेळी दिले.

या सभेत बोलत असताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आता रामराजे मला भाजपमध्ये घ्या म्हणून मागे लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या मागे तडजोड करू असे ते सांगत आहेत. सत्तेतून बाहेर पडल्याने मासा जसा तडफड करतो तशी त्यांची आता तडफड होत आहे. पण आता यांना भाजप तर सोडाच राष्ट्रवादी सुद्धा आता तिकीट देईल का नाही याची शंका आहे, कारण यांच्यावर आता कुणाचा विश्वास राहिला नाही असं खासदार निंबाळकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

ranjitsinh naik nimbalkar , ramraje naik nimbalkar, satara , phaltan
Shivsena : आदित्य जी ! खासदार विनायक राऊत हे..., वाचा शिवसैनिकांची तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com