Shinde Government : तरुणांसाठी आनंदाची बातमी; नमो महारोजगार मेळाव्यांमधून निर्माण होणार २ लाख रोजगार

Namo Maharojgar : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीच जनहिताचे तब्बल २० निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील युवकांच्या हाती काम देण्यासाठी सरकार रोजगार मेळावे घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
State Government
State Government
Published On

नोकरी शोधणाऱ्या राज्यातील युवकांसाठी शिंदे सरकारने आनंदाची बातमी दिलीय. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी सरकार रोजगार मेळावे भरवणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. याविषयीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. (Latest News)

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री ( Chief Minister) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीच जनहिताचे तब्बल २० निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील युवकांच्या हाती काम देण्यासाठी सरकार (Government) रोजगार मेळावे घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसुली विभागात एक याप्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्याचे ठरले. या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार (Employment) व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली असून उद्योजकांसह विविध घटकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

आधीच्या मेळाव्यात ११ हजार उमेदवारांना रोजगार

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत डिसेंबर महिन्यात 'नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवसीय मेळाव्यात ६७ हजार ३७८ उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी ११ हजार ९७ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला होता. नागपूर येथील नमो महारोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

State Government
AI Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे २५ कोटी लोकांना मिळणार रोजगार: देवेंद्र फडणवीस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com