दोन मित्रांनी रोपवाटिकेतून लावले समृद्धीचे झाड

चार राज्यात जाताय रोप; चाळीस जंणाना दिलाय रोजगार
दोन मित्रांनी रोपवाटिकेतून लावले समृद्धीचे झाड
दोन मित्रांनी रोपवाटिकेतून लावले समृद्धीचे झाडसंजय राठोड
Published On

संजय राठोड

यवतमाळ - पारंपरिक शेतीतून शेतकरी Farmer उद्ध्वस्त होत चालला आहे. त्यातच सुशिक्षित वर्गाने सुद्धा पदवीच्या प्रतिष्ठेपायी शेतीकडे पाठ फिरविली. मात्र आर्णीतील गजानन केशववार Gajanan Keshavwar व प्रवीण जैन Pravin Jain या दोन पदवीधर मित्रांनी २४ वर्षांपासून पारंपारीक शेतीला फाटा देऊन रोपवाटिकेचा व्यवसाय सुरु केला.या रोपवाटिकेतून त्यांनी ४० जणांना रोजगार दिला आहे. एवढेच नव्हे तर रोपवाटिकेतून या उमद्या पदवीधर मित्रांनी आर्थिक समृद्धीची दिशा गवसली.

निसर्गाच्या भरोशावर असलेल्या शेतीने त्यांना पाहिजे तसा आधार दिला नाही. परंतू यामुळे ते खचून न जाता गजानन व प्रवीण यांनी सन १९९७ साली रोपवाटिका सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. किसान रोपवाटिका या योजनेतून त्यांनी रोपवाटिका सुरु केली. रोपवाटिकेमध्ये त्यांनी अनेक वृक्ष तयार केले. तब्बल चार वर्ष या व्यवसायात त्यांना पाहिजे तसा नफा मिळाला नाही. मात्र जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी कायम ठेवत आपल्या व्यवसायाशी ते समर्पित वृत्तीने बांधील होते.

हे देखील पहा -

अखेर २००२ पासून त्यांच्या या रोपवाटिकेच्या व्यवसायाला चांगले दिवस आले. फळझाडे, फुलझाडे, शोभीवंत झाडे, कोरडवाहू शेतीमध्ये येणारी विविध फळझाडे, औषधी वनस्पती आदींची मागणी वाढू लागली. त्यांच्या रोपवाटिकेत जवळपास हजारो पेक्षा जातींची विविध रोपे आहेत. व्यवसायत जम बसल्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आदी राज्यात त्यांच्या रोपवाटिकेतील रोपे जाऊ लागली.

स्वतःसह ४० जणांना या तरुणांनी आपल्या रोपवाटीकेतून रोजगार उपलब्ध करुन दिला. अर्थाजन करीत असताना गजानन व प्रयीण यांनी आपले 'सामाजिक भान कायम ठेवले. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. रोपवाटिकेवर काम करणाऱ्या तरुणांना व्यसनमुक्त केले. जैविक पद्धतीने रोपवाटिका फुलविल्यामुळे त्यांनी एक अनोखा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे.

दोन मित्रांनी रोपवाटिकेतून लावले समृद्धीचे झाड
कोरोनाच्या काळात सुरू झालेली जनसेवा थाळी अजूनही सुरूच...

केळझर वरठी. येथील शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या स्मृतिस्थळाजवळ एक हजार सागवान वृक्षाची लागवड करून या तरुणांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा वृक्षारोपणाचे धडे त्यांनी दिले. वृक्षारोपणाची चळवळ सामान्य माणसात रुजावी आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाला गती यावी म्हणून त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांची रोपवाटिका निराश शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखविणारी ठरत आहे. शेती परवडत नाही. पदवी घेऊन नोकरी मिळत नाही. अशा मानसिकतेच्या तरुणांना एक नयी दिशा या दोन्ही पदवीधर मित्रांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com