अभिजित सोनावणे
मालेगाव : नाशिकच्या मालेगावात (Malegaon) सामान्य रुग्णालयामधील नर्सिंग कॉलेज इमारतीमध्ये कोब्रा जातीचे नाग आढळल्याने एक खळबळ माजली. नर्सिंग कॉलेजमध्ये तब्बल दोन कोब्रा नाग दिसताच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. नर्सिंग कॉलेज इमारतीमध्ये नाग आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. नाग (Snake) दिसताच या इमारतीमधील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्राच्या (Snake-friend) पथकाला कळविले. त्यानंतर या सर्पमित्रांच्या पथकांनी दोन नागांना पकडले आहे.
( malegaon latest News In Marathi )
हे देखील पाहा -
नाशिकच्या मालेगावमधील सामान्य रुग्णालयाजवळ काही वर्षापूर्वी तेथील परिचारिका आणि नर्सिंग करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी नूतन इमारत बांधण्यात आली. या इमारतीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ महिलांचा सामावेश असतो. काल दुपारच्या सुमारास एका रुमजवळ कपाटाखाली सापांची २५ ते २६ अंडी आढळून आली. त्या अंडीजवळच दोन सर्प दिसताच इमारतीमधील कर्मचाऱ्यांची एकच घाबरगुंडी उडाली. साप आढळल्याची माहिती सर्वांना कळताच संपूर्ण इमारतीमध्ये भीतीचे वातवरण पसरले. ही बाब निदर्शनात येताच इमारतीमधील महिलांनी सर्पमित्र नितीन सोनावणे यांना बोलाविले.
त्यांनतर सर्पमित्र नितीन सोनावणे यांनी त्यांचा पथकाला घेऊन नर्सिंग कॉलेज इमारतीजवळ धाव घेतली. या सर्पमित्रांच्या पथकाने सापांच्या अंडीजवळ दोन भारतीय कोब्रा जातीच्या सर्पांना पाहिले. त्यानंतर सर्पमित्र नितीन सोनावणे यांचं पथक सजग झालं. त्यानंतर त्यांच्यजवळी साहित्याचा आधारे दोन भारतीय कोब्रा जातीच्या सर्पाना शिताफीने पकडले. या ठिकाणी आढळलेल्या अंड्यामध्ये काही सर्पाची अंडी ही खराब झाली होती. तर काही चांगली अंडी असल्यामुळं ती अंडी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. दोन्ही सापांना पकडण्यात आल्याने या इमारतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.