Akola Farmer: नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २ शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

Akola Farmer : कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. अकोला जिल्ह्यातील आगर आणि कोठारी गावात शेतकरी आत्महत्याचे घटना समोर आली आहे.
Akola Farmer
Akola Farmer

(अक्षय गवळी , अकोला)

Akola Two Farmers :

देशात १८ लोकसभा निवडणूक होणार आहे. शेतीमध्ये आधुनिक सुधारणा झालीय. पण शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा आणि नापिकचं संकट मात्र अजून कमी झालेलं नाही. अकोला जिल्ह्यात शनिवारी २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. (Latest News)

अकोला जिल्ह्यातील आगर आणि कोठारी गावात शेतकरी आत्महत्याची घटना समोर आली आहे. कोठारी गावातले बसंता सखराम सराटे आणि आगर गावातील रमेश नारायण गव्हाळे (वय 55) असं या दोन्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नावे आहेत. सततचे नापीक आणि कर्जबाजारातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान सराटे यांनी रेल्वे समोर उडी घेत आपलं जीवन संपवलं. तर गव्हाळे यांनी शेत तलावामध्ये उडी घेत आत्महत्या केली.

अकोला जिल्ह्यातील कोठारी गावात राहणारे शेतकरी सराटे शेतकरी दांपत्य. बसंता सखराम सराटे हे शेतकरी असून त्यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू शेती आहे. या हंगामात त्यांनी सोयाबीन त्यानंतर हरभऱ्याची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक फार कमी झालंय. त्यात पावसाअभावी हरभऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. विशेष म्हणजे पेरणीसाठी त्यांनी खासगी बँक तसेच बाहेरून कर्ज उचललं होतंय.

मात्र कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना बँकेच्या नोटीस प्राप्त झाल्या. याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. दरम्यान कोठारी शेताजवळील रेल्वे लाईनवर जात रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यातीलच उरळ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या 'आगर' गावील रहिवासी रमेश नारायण गव्हाळे (वय 55) यांनीही आत्महत्या केलीय. याच्या २ एकर शेती आहे. त्यांनी यंदा कापूस लागवड केला होता. परंतु नापिकेमुळे त्यांना २ एकरात ४ क्विंटल एवढाच कापूस झाला. गव्हाळे यांच्यावर देखील बँकेचे कर्ज होतं, कर्जाच्या परतफेडच्या तणावात ते होते.

याशिवाय बाहेरील कर्जही होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या नातीचाही नदीच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला होता. नात गमावल्याचंही टेन्शन त्यांना होतं. याच तणावातून गव्हाळे यांनी आज आगर गावातल्या शिवारातीलच एका तलावामध्ये उडी घेत आत्महत्या केली.

Akola Farmer
Buldhana News : होळी दिवशीच शेतकरी बाप-लेकाचा अपघात; पित्याचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com