Turmeric Market Rate: शेतकऱ्यांचं पिवळं सोनं उजळलं, हळदीला मिळाला उच्चांकी दर

शेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून ओळख असलेल्या हळदीला हिंगोली जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या शेवटी उच्चांकी दर मिळाला आहे.
Turmeric Market High Rate
Turmeric Market High RateSaam Tv
Published On

Turmeric Get High Rate: हिंगोली: शेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून ओळख असलेल्या हळदीला हिंगोली जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या शेवटी उच्चांकी दर मिळाला आहे. सध्या हिंगोलीत हळदीला 11 हजार 869 प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे (Turmeric Get High Rate Of 11 thousand 869 Rs Per Quintal In Hingoli).

Turmeric Market High Rate
Nagpur: अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत; ''पालकमंत्री राजकारणात व्यस्त''

हिंगोली (Hingoli) बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आज झालेल्या हळदीच्या सौद्यात उच्चांकी 11 हजरा 869 रुपयांचा दर मिळाला आहे. तर काल हिंगोलीच्या मार्केट यार्डात देखील हळदीला चांगला दर मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले होते. हळदीचे उत्पादन झाल्यानंतर काही महिने हळदीचे भाव घसरले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या या पिवळ्या सोन्याला सेनगाव आणि हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये तब्बल 11,869 एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. विक्रमी दर मिळाल्याने हळद (Turmeric) उत्पादक बळीराजा मालामाल झाला आहे.

Turmeric Market High Rate
सांगलीत दुचाकी इंजिनचा वापर करुन, पठ्ठ्यानं शेती मशागतीसाठी बनवली चारचाकी गाडी

वसमत बाजारपेठेत हळदीला उच्चांकी दर

राज्यात सांगली (Sangli) जिल्ह्यानंतर हिंगोली आणि त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर मिळत आहे. मात्र, यावर्षी हळदीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. मराठवाड्यासह विदर्भातून यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातून हिंगोलीच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला येते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com