प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Viral Claim Exposed: प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे...होय, तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे...कारण, सोशल मीडियावर तसा मेसेज व्हायरल केला जातोय...त्यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केल्याने आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
The viral message claiming 'One Government Job Per Family' is false and misleading, confirmed via official sources.
The viral message claiming 'One Government Job Per Family' is false and misleading, confirmed via official sources.Saam Tv
Published On

केंद्र सरकारने आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणलीय...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय...सरकारची योजना आहे मग फॉर्म कसा भरायचा...? नोकरीसाठी शिक्षण किती हवं..असे अनेक प्रश्न विचारले जातायत...त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली...मात्र, मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहुयात...

केंद्र सरकारने एक परिवार, एक नोकरी योजना आणलीय. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार. यासाठी पुरुष, महिला कुणीही अप्लाय करू शकतात.हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...तसे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जातायत...कारण, सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते...सरकारी नोकरी असली की चांगला पगार, भत्ते, सुट्ट्या, सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात...त्यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करतात...आणि सरकारनेच जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे...मात्र, हा दावा खरा आहे का...? याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे...आमच्या टीमने या दाव्याची पडताळणी सुरू केली...केंद्र सरकारने अशी कोणती योजना आणलीय का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

सरकारची एक परिवार, एक नोकरी योजना नाही

दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल

कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास उघडू नका

लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो

सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत...आणि प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवीय...त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात...तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात...त्यामुळे तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका,...आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com