
योगेश काशिद
Suresh Dhas News Update : सतीश भोसले याने तस्करी केलेल्या हरणांचे मटण सुरेश धसांना जाते, असा खळबळजनक आरोप टीपी मुंडे यांनी केला आहे. गावकऱ्यांसह ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची महितीही मुंडे यांनी दिली. भाजपा आमदार सुरेश धस आणि सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या विरोधात रविवारी शिरूरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटन सुरेश धस यांना पोहोच केले जाते, म्हणून सतीश भोसलेवरती गुन्हे दाखल होत नाहीत. चार दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचं. अशाप्रकारे जर होत असेल तर सतीश भोसलेवर कसा गुन्हा दाखल होईल. या गंभीर प्रकरणासंदर्भात मी वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे. मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी विशेष भेट घेणार आहे, असे टीपी मुंडे यांनी सांगितले.
मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळासोबत ही भेट असणार आहे. हरण तस्करीमध्ये सुरेश धस देखीलसह आरोपी झाले पाहिजेत. हे दुसऱ्यांना म्हणतात आका हे तर आकाचे आका आहेत. वाल्मीक कराडांपेक्षा जास्त गुन्हेगार सुरेश धासांकडे आहेत. हरीण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करणे याच्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते? अशा प्रकारचे लोक ठेवून तस्करी करायला लावतो. मुख्यतः पहिल्यांदा सुरेश धसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.