राहुरी मुळा धरण परिसरात तुफान पाऊस; धरणाचे अकरा दरवाजे उघडले

आज रविवारी सायंकाळी ५ वाजता धरण साठा २४ हजार ३९० दशलक्ष घनफूट (९३.८० टक्के) झाला.
Mula Dam
Mula DamSaam TV
Published On

विलास कुलकर्णी -

राहुरी: येथील मुळा धरण (Mula Dam) परिसरात तुफान पाऊसामुळे (Rain) धरणामध्ये भरपूर पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे आता मुळा धरणाचे सर्व म्हणजे अकरा दरवाजे ५.४ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या २ हजार १६० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी मुळा नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) दिशेने झेपावत आहे.

मुळा पाटबंधारे विभाग (Mula Irrigation Department) अहमदनगरच्या (Ahmednagar) कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे विधीवत जलपूजन करून, धरणाचे ११ वक्र दरवाजे उघडण्यात आले. यावेळी जलसंपदाचे उप अभियंता शरद कांबळे, शाखाधिकारी बन्सी घोरपडे, कर्मचारी सलीम शेख, दिलीप कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ -

आज रविवारी सायंकाळी ५ वाजता धरण साठा २४ हजार ३९० दशलक्ष घनफूट (९३.८० टक्के) झाला. लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदी पात्रातून ५ हजार ९९० क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होती. धरण सूचीनुसार १५ ऑगस्टपर्यंत २२ हजार ८१४ दशलक्ष घनफूट; तर, १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान २५ हजार ४३८ दशलक्ष घनफूट पाणी स्थिर ठेवून धरणात नव्याने जमा होणारे पाणी नदीपात्रात सोडावे लागते.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. धरण साठा झपाट्याने वाढत आहे. मुळाजलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायंकाळी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Mula Dam
Egyptian Church Fire |इजिप्तमध्ये चर्चला लागली भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू , ५५ जखमी

दरम्यान, मुळा धरणाच्या वक्री दरवाजांवर आकर्षक रंगांचे प्रखर विद्युत झोत टाकण्यात आले आहेत. धरणाच्या सर्व अकरा दरवाजाद्वारे सोडलेल्या विसर्गाचे पाणी विविध रंगी प्रकाशात न्हावून उजळत आहे. अंधार पडल्यावर हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळणार आहे.

मुळा धरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात, मात्र, धरणावर जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. मुळा धरण प्रतिबंधित क्षेत्र आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. पर्यटकांनी धरणावर येऊ नये. अन्यथा, त्यांच्यावर शासन नियमानुसार फौजदारी कारवाई केली जाईल. असं मुळा पाटबंधारे विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com