Marathi News Live : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगारांकडून 2 पिस्तुल आणि 6 काडतुसे जप्त

Maharashtra Breaking News Update 19 February : राज्यातील आणि देशातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Today's Live Batmya in Marathi 19 February 2024  Latest Update on  Manoj Jarange, Farmer Protest and on overall Maharashtra
Today's Live Batmya in Marathi 19 February 2024 Latest Update on Manoj Jarange, Farmer Protest and on overall MaharashtraSaam TV
Published On

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगारांकडून 2 पिस्तुल आणि 6 काडतुसे जप्त

पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून 2 पिस्तुल आणि 6 काडतुसे जप्त

पुण्यातील येवलेवाडीत परिसरातील घटना

कोंढवा पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगारांना देखील बेड्या

प्रफुल्ल निकम,सिमोन मिरिंडा,समीर संकपाळ अस अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे

रत्नागिरी -नागपूर मार्गावर भीषण अपघातात तीन जण ठार

सांगलीच्या शिरढोण येथे भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळ भरधाव गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.

विशेष अधिवशेनात सगेसोयरे संदर्भातील अधिसुचनेच्या मुद्यावर चर्चा होणार नाही?

उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी

सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती

सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सूरू असून लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार

यवतमाळमध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार

यवतमाळमध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडली आहे. युवा काँग्रेसचे जिल्हा सचिव जितेश नवाडे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

यवतमाळ येथील विश्रामगृहात सेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. काँग्रेसचे जितेश नवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, शिवसेना पदाधिकारी यांच्या बैठकीत काँग्रेसचे जितेश नवाडेसह अनेकांनी पक्षप्रवेश केला.

मराठी अभिनेत्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख; उदगीरमधील तरुणांनी केली माफी मागण्याची मागणी

अभिनेत्री प्रार्थना बहिरेने केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकेरी शब्दात उल्लेख केल्याने उदगीर शहरातील तरुणांनी केला प्रार्थना बहिरेचा निषेध केला. तसेच तिच्या स्वागतासाठी लागलेले बॅनर फाडत माफी मागण्याची मागणी केली.

माजी मंत्री रजनी सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांना अश्रू अनावर

महाराष्ट्र राज्याच्या माजी आरोग्य मंत्री व महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रजनी सातव यांच्यावर आज कळमनुरी शहरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने सातव यांचे निधन झाले होतं. रजनी सातव यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक

थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक

उद्याचे विधीमंडळाचे विशेष अधिवेशन आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होणार

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात बैठक

पुण्यातील शाळेत मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

पुणे

पुण्यात वाघोली येथील जेएसपीएम शाळेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

जेएसपीएम शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना ऐन परीक्षेच्या वेळेस मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप

कोरोना काळातील जुन्या फी वसुलीसाठी १० वी परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याने मनसेचा संताप

मनसेकडून आंदोलन

नवी मुंबई विमानतळ या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार

नवी मुंबई विमानतळ या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मेट्रोचे जाळे सर्व ठिकाणी पसरल्यानंतर मुंबई लोकलवरील ताण कमी होणार

सध्या मेट्रोमधून 9 बिलियन प्रवासी प्रवास करत आहेत.

सर्व मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर ही संख्या दुप्पट होईल

अमित ठाकरे काढणार पुण्यात मोर्चा, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार

पुणे

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता अमित ठाकरे मैदानात उतरणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मोर्चाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात धडक मोर्चा

२३ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात धडकणार मोर्चा

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार

उद्धव ठाकरे यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा?

नवी दिल्ली -

दिल्ली सीमेवरच्या शेतकरी आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटण्याची शक्यता

शिवसेना ठाकरे गटाकडून भेटीबाबतच्या दौऱ्याची चाचपणी

MSP च्या मागणीसह इतर मागण्यांसाठी उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन

शंभू बॉर्डरवर उद्धव ठाकरे हे आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता

लवकरच भेटीची वेळ निश्चित होणार

रायगड किल्ल्यावरील हिरकणी कड्यावर अडकलेल्या २ शिवप्रेमींची अखेर सुटका

किल्ले रायगडच्या हिरकणी कड्याच्या खालच्या बाजूस अडकलेल्या दोन शिवप्रेमींना सुखरूप खाली उतरवण्यात स्थानिकांना यश

एक तरूण सातारा येथील, तर दुसरा उत्तर प्रदेशातील

पुणे येथे नोकरी निमित्ताने एकत्र असलेले हे दोघे किल्ले रायगड फिरायला आले होते

हिरकणी बुरूज परिसरातून शॉर्टकटने खाली उतरण्याच्या नादात दोघेही रस्ता चुकले

हिरकणी वाडीतील स्थानिक तरूणांनी दोघांना सुखरूप खाली उतरवले

मी कुठे येणार नाही आणि जाणारही नाही : जयंत पाटील

भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम

मी काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही : जयंत पाटील

प्रसिद्धी द्या, प्रसिद्धी दिल्याशिवाय लोकांच्या समोर जाण्याची संधी राहिली नाही आता... जयंत पाटील यांचं उत्तर

पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांच्या हाती आले कोयते

पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांच्या हाती आले कोयते

पुण्यातील येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी केली अटक

परिसरातील नागरिकांना भयभीत करणाऱ्या तरुणांनी घेतलं ताब्यात

पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल

४० वर्षीय महिलेने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप मनसेत चर्चेची खलबतं

राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप मनसेत चर्चेची खलबतं

केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती

मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचे नो रिस्क धोरण

मनसे-भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती

मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती

मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती

जागांबाबत आज बैठकीत झाली चर्चा

मनसेने मुंबईतील काही जागा मागितल्याची सूत्रांची माहिती

मनसे सोबत आली तर भाजपला अधिक फायदा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातील बड्या नेत्या बाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची 'साम टीव्हीला माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंघ असून येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याची पाटील यांची माहिती

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न असल्याची पाटील यांची सत्ताधारी गटावर टीका

रायगडच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले

रायगडच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले

रेस्क्यू टीमला पाचारण

रोपवेच्या रस्त्यावर स्थानिकांनी या तरूणांना पहिल्यानंतर गोंधळ

गडावर पुन्हा परत जाणे अगर खली उतरणे कठीण असल्याने दगडाचा आधार घेत दोघेही थांबले

छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय नेत्यांकडून शिवरायांची आरती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात मुख्य असलेल्या क्रांती चौकात शिवजयंतीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून शिवरायांची सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी आमदार कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केली जप्त

पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केली जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली कारवाई

पुणे पोलिसांनी केले तब्बल ४ कोटी रुपयांचे एम डी ड्रग्स जप्त

ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस

पोलिसांकडून ३ ड्रग्स तस्करांना पोलिसांनी केली अटक

पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

पुण्यात सुरू होते रोहिदास जाधव या तरुणावर उपचार

काही दिवसांपूर्वी रोहिदास ने ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतलं होतं

दिलेल्या तक्रारीत पोलीस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता

सोलापूर : शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग, दोन एकर ऊस जळून खाक

सोलापूर : शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग, दोन एकर ऊस जळून खाक

अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगी गावात शॉर्टसर्किटमुळे उसाला लागली आग

परमेश्वर मणुरे या शेतकऱ्याचा दोन एकर उस जळून खाक

शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

तालुक्यात अगोदरच दुष्काळजन्य परिस्थिती आणि अशातच मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल

यवतमाळमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह 1 लाख 88 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह 1 लाख 88 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन रोडवरील पाटणपुरा फाट्याजवळ कारवाई

नितीन राजूरकर राहणार नेरड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव

शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहराच्या मध्यभागातील वाहतुकीमध्ये आज बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सोमवारी सकाळी सात ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. पुण्यातील या रस्त्यांवर सकाळपासून जल्लोष मिरवणुका काढण्यात येतात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते यासाठी शहरातील या रस्त्यांवर आज वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com