Today's Marathi News Live: वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra chya Tajya Marathi Batmya Live (29 march 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या संक्षिप्त आढावा.
Today's Live News on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV News
Today's Live News on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV NewsSaam Tv

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यात आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असतानाच मालेगाव तालुक्यात मात्र दुपारच्या वेळी अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे या वाढत्या तापमानातून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तर उन्हाळी पिकांनाही या पावसाचा फायदा होणार आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाममुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून वाळत घातलेली हळद भिजण्याची शक्यता आहे.

नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ यांनी घेतली शरद पवार गटाची भेट

गोकुळ झिरवळ दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक

गोकुळ झिरवळ यांनी घेतली शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची घेतली भेट

नरहरी झिरवळ सध्या अजित पवार गटात

मात्र त्यांचे चिरंजीव शरद पवार गटाकडून इच्छुक

लोकसभा निवडणुकीसंदर्भात उद्या निर्णय घेणार, मनोज जरांगे यांची माहिती

राजकारण हा माझा विषय नाही, मात्र समाजाची इच्छा आहे म्हणून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. उद्या गावागावातून येणाऱ्या अहवाला बाबत निर्णय घेण्यात येईल.त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हणून जरांगे पाटील यांनी दिलीय.कोण काय म्हणत याबाबत सर्व पिक्चर उद्या क्लियर होणार आहे. मराठ्याच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होतो आणि कुणाला तोटा होतो हे सगळं उद्या क्लियर होईल. मायबाप समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याच सागतं असं म्हणणाऱ्या ना उद्या कळेल असा इशारा ही जरांगे यांनी दिलाय.

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, विनायक चौधरी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उबाठाला शिंदेंचा आणखी एक धक्का

उबाठाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांचे बंधू संजय विनायक चौधरी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

संजय विनायक चौधरी, शाखा क्रमांक २०५ च्या शाखा संघटक अनुराधा इनामदार तसेच श्रीकांत साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत संजय चौधरींनी केला पक्ष प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर CPI ला मोठा झटका, आयकर विभागाची नोटीस

CPI ला आयकर विभागाची नोटीस

११ कोटी रुपयांची विभागाने पाठवली नोटीस

आयकर थकवल्या प्रकरणी पाठवली नोटीस

नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक, पदाधिकाऱ्यांचं सामूहिक राजीनामास्त्र

- नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक

- भाजप पदाधिकाऱ्यांचं सामूहिक राजीनामा अस्त्र

- नाशिक लोकसभा मतदारसंघातील २० पैकी १० ते १२ मंडल अध्यक्ष देणार सामूहिक राजीनामा

- नाशिकची जागा भाजपाला न सोडल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा

- नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील तणाव वाढण्याची चिन्हं

- छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता पुन्हा भाजप आक्रमक

- दरम्यान यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर?, सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

गेल्या अनेक दिवसापासून लातूरमध्ये देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत, मात्र अशातच डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखीन जास्त उधाण आल आहे . डॉ. अर्चना पाटील चाकूरकर त्यांचा भाजपमध्ये केव्हा प्रवेश होणार आणि कोठे होणार याची उत्सुकता लातूरमध्ये अनेकांना लागली आहे.

दोन एप्रिल रोजी सर्व काही उघड करू, महाविकास आघाडीवरून प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य

मागे देखील मी म्हटलं होत की सेना आणि काँग्रेस यांच सूत जुळलेलच नाही आणि ते आता यादी आल्यावर कळतंय

जरांगे पाटील यांची यादी उद्या येईल असं वाटतंय

आमचे दरवाजे कोणासाठीच बंद झालेली नाहीत

जरांगे पाटील यांच्याशी माझ बोलणं झालंय की एका मतदार संघात जास्त उमेदवार देण योग्य नाही

जोपर्यंत आम्ही सुभाष देसाई यांच्याशी बोलत होतो तेव्हा सर्व व्यवस्थित सुरु होत पण नंतर आम्हाला दिसलं की कोण तरी कोणासाठी तरी वापरतय हे बरोबर नाही

संजय राऊत या इंडिविज्युअल माणसांवर बोलायचं नाही

तीन जागा कोणत्या दिल्या होत्या याबद्दल मला बोलायचं नाही

जे आले पाहिजे त्यांना घेऊन आम्ही काही उभं करणार आहोत

आमचे दरवाजे अद्यापही उघडे आहेत

दोन एप्रिल रोजी आम्ही सर्व काही उघड करु

तिन्ही पक्षांचे स्वत:मध्येच जमत नव्हते

5 एप्रिलला काँग्रेस प्रसिद्ध करणार जाहीरनामा, लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लान

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन

5 एप्रिलला काँग्रेस पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करणार

6 एप्रिलला काँग्रेसच्या दोन मोठ्या रॅली

उत्तर भारतात एक आणि दक्षिण भारतात एक रॅली घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करणार

उत्तर भारतात जयपूरमध्ये तर दक्षिण भारतात हैदराबाद मध्ये काँग्रेसची रॅली

सोनिया गांधी जयपुर मधील रॅलीला उपस्थित राहणार

हैदराबाद मधील रॅलीला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार

नवनीत राणांविरोधात प्रहारकडून उमेदवाराची घोषणा, दिनेश बुब  निवडणुकीच्या रिंगणात 

अमरावतीतील ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांचा प्रहार पक्षात प्रवेश

उमेदवारी न दिल्याने बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात केला प्रवेश

प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत दिनेश बुब यांचा प्रवेश

दिनेश बुब प्रहार पक्षाकडून नवनीत राणांविरोधात अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार

पक्षाने केली अधिकृत घोषणा

विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या, डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांची कारवाई

विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

विदेशी पिस्तूलासह दोन जिवंत काडतुसं जप्त

डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांची कारवाई

सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांची माघार

सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांची माघार

श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत घेतली माघार

शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह

याशिवाय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाचीही जोरदार मागणी

निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

आमदार निलेश लंके आज दुपारी 2 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेणार

निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

मतदारसंघातील जनतेचा कौल जाणून घेऊन निर्णय घेणार

जो काही निर्णय होईल तो महत्वपूर्णच असेल, निलेश लंके यांचं वक्तव्य

माझा मतदारसंघ माझं कुटुंब आहे, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी बोलून निर्णय घेणार

धुळ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

धुळ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक लावली जोरदार हजेरी

अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती

अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात निर्माण झाला गारवा

उघड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा

माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक- शरद पवार

अमोल किर्तीकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स, ८ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

अमोल किर्तीकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स

८ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात समन्स जारी

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमोल कीर्तीकरांच्या अडचणी वाढल्या

नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

नाशिक जिल्ह्यात लासलगाव तसेच चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने, पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी

काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहू लागले

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

सकाळपासूनच ढगाळ वतावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता

शेकाप नेत्या मिनाक्षीताई पाटील यांचे निधन

शेकाप नेत्या मिनाक्षीताई पाटील यांचे निधन

वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आज दुपारी 2 वाजता पेझारी येथे होणार अंत्यविधी

अलिबागच्या माजी आमदार, माजी राज्यमंत्री असणाऱ्या मिनाक्षीताईंनी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचं अध्यक्षपदही भुषवलं होतं

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता

आज रात्रीपर्यंत जाहीर होणार उमेदवरांची यादी

बारामती, शिरुर, रायगड, धाराशीव आणि नाशिक या ५ जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता

महायुतीच्या भाजपा आणि शिंदेच्या उमेदवारांची यादी आधीच जाहीर

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर व हसन मुश्रीफ यांच्यात काल नाशिक-धाराशीवच्या जागेवरून चर्चा

नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा फोटो

नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा फोटो

राज ठाकरे महायुतीमध्ये नसताना त्यांचा फोटो राणा यांच्या पोस्टरवर

तर आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक असताना सुद्धा त्यांचा फोटो पोस्टरवर नसल्याने एकच चर्चा

बच्चू कडू व राणा दाम्पत्य यांच्यात पुन्हा पोस्टवरून दुरावा दिसून आला

नागपूरमधील बुट्टीबोरी येथील इंडोरमा कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील इंडोरमा कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

रामचंद्र रामटेके अस कामगारांच नाव, खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

21 मार्चला इंडोरा कंपनीत वेल्डिंग काम सुरू असताना झाला होता स्फोट

एकूण सात कर्मचारी झाले होते जखमी

छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी आता पुन्हा होणार प्रवेश परीक्षा

छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी आता पुन्हा होणार प्रवेश परीक्षा

तत्कालीन कुलगुरूंचा निर्णय विद्यमान कुलगुरूंनी फिरवला

शासनाच्या समर्थ पोर्टलवर विद्यार्थ्यांना करावी लागेल नोंदणी

4 एप्रिल च्या बैठकीत होईल अंतिम निर्णय

अयोध्येतील राम मंदिर राम नवमी काळात २४ तास खुलं राहणार

अयोध्येतील राम मंदिर राम नवमी काळात २४ तास खुलं राहणार

१५ ते १७ एप्रिलदरम्यान भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुलं असणार

जवळपास १५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा प्रशासनाचा अंदाज

राम नवमी उत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाची पार पडली बैठक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com