दिंडोरीच्या जागेवर माकपचा दावा
दिंडोरीची जागा लढवण्यावर माकप ठाम
राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरीची जागा माकपसाठी सोडावी, माकपचा आग्रह
शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याचा माकपचा दावा
माकप दिंडोरी लोकसभेची जागा लढवण्याच्या तयारीत
शरद पवार गटाने जागा न सोडल्यास माकप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
माजी आमदार जे पी गावित दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक
24 पहिल्या टप्यात आणि दुसऱ्या टप्यात 24 जागांची निवडणुक घ्यावी
महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घेण्याची काय गरज नाही
दोन टप्यात निवडणुका घ्यावा अशी आमची मागणी आहे
आम्ही पत्र इलेक्शन कमिशनला पाठवू, आमचं म्हणणं मांडू
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपवेळी चैत्यभूमीवर राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित असणार
लोकसभेच रणशिंग उद्या मुंबईत INDIA आघाडीकडून फुंकले जाणार त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आणखी एक नेता मुंबईत
भांडुप सोणापुर येथे राहुल गांधी याची भारत जोडो यात्रा दाखल
प्रियांका गांधी देखील राहुल गांधी याचा सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
प्रियांका गांधी राहुल गांधी यांच्यासोबत
महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
कोणताही प्रचार होताना कोणत्याही प्रकारची मर्यादा न ओलांडण्याचे आदेश राजकीय पक्षांना देण्यात आलेत. राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनादेखील प्रचारात सामावून घेता येणार नाही.
निवडणूक प्रचारादरम्यान आरोपांचा आणि भाषेचा स्तर घसरल्यास निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे.
या निवडणुकीत टेक्नॉलॉजी आणि मनुष्यबळ परिपूर्ण आहेत. 18 ते 19 या वयातील 1.8 कोटी तरुण यावेळी मतदार आहे. हे मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 82 लाख मतदार हे 85 पेक्षा जास्त वयाचे आहेत. 48 हजार तृतीयपंथीय मतदान करणार आहेत.
राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त -
97 कोटी मतदारांनी नोंद केली आहे.
54 लाख पेक्षा जास्त EVM मशिन्स आहेत.
मागच्या वर्षात 11 राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या.
कोर्टाने आमच्यावर केलेल्या तिपणी देखील कमी झाल्या.
फेक न्यूजला मोठ्या प्रमाणावर आळा घातला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होत आहेत. यासाठी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार माध्यमांशी संवाद साधत आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यसह निवडणूक आयुक्त एस.एस. सिंह आणि ज्ञानेश कुमारही येथे हजर आहेत.
सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता नागरिक हैराण आहेतच मात्र भर उन्हात वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक पोलीस चौकीत पाण्याची व्यवस्था करत कल्याण पश्चिम चे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेतील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कुलरचे वितरण करण्यात आले. त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले.गेल्या काही दिवसात कल्याण पश्चिम मतदारसंघात तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली
लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खडा जंगी सुरू असताना हिंगोली लोकसभा शिवसेना लढविणार असल्याचे सांगत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी विवाह सोहळ्या मध्येच हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी हिंगोलीची जागा कुणाला द्यायची हे अद्याप निश्चित केल नसताना बांगर यांनी मात्र विवाह सोहळ्यातच केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप एकवटली आहे. आम्ही दोनवेळा बारणेंसाठी झटलो, मात्र आता आम्हाला बारणे उमेदवार नकोत, अशी भावना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री शंभूराजे देसाई विजय शिवतारे यांच्या भेटीला
पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये विजय शिवतारे उपचार घेत आहेत त्या ठिकाणी शंभूराजे देसाई आले आहेत
विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितल्याने त्या ठिकाणी विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवू नये अशी विनंती करण्यात येते आहे
उद्धव ठाकरे आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शाखा भेटी देणार आहेत
आज डोंगरी आणि माझगाव या भागातील शाखांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत
सायंकाळी साडेसहा वाजता उद्धव ठाकरे डोंगरी येथील शाखेला भेट देतील
त्यानंतर साडेसात वाजता माझगाव येथील शाखेला ते भेट देणार आहेत
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखा भेटींचा कार्यक्रम सुरू केला आहे
यामध्ये ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असून आपल्या पक्षाची संघटनात्मक ताकद मजबूत करत आहेत
- शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली, सूत्रांची माहिती.
- शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरवण्याची चाचपणी सुरू.
- गोकुळ पिंगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश देवून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा.
- शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात नाशिकच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.
- महायुतीच्या हेमंत गोडसेंविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग.
- नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडलेली असली तरी सक्षम उमेदवारीसाठी महाविकास आघाडीची खलबते.
- मुंबईत आज होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता.
स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने बिजली नगर भागात जवळपास सात आठ महाल वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून गावगुंड्याच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे. स्थानिक नागरिकाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडाच्या टोळक्याने ही वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये स्थानिक नागरिकांनी तक्रार दाखल केली असून वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.
दक्षिण मुंबईत भाजपच्या राहुल नार्वेकरांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे.
मात्र, दक्षिण मुंबईतल्या दोनशे ते तीनशे शिवसेना कार्यकर्त्यांनी सह्या करून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचा उमेदवार द्या, असं शिवसैनिकांनी पत्रात म्हटलं आहे.
आधीच ठाणे, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.
त्यातच शिवसैनिकांनी आता दक्षिण मुंबई जागेवर उमेदवार देण्याची मागणी केल्याने भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगलं आहे. खासदार उदयनराजें यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांचे समर्थक करीत आहेत. अशातच फलटणचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव साताऱ्यासाठी पुढे आल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या १० जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. यावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएमचे लोकसभा निवडणुकीत खातेही उघडणार नाही. महाराष्ट्रातील त्यांचे सर्वच उमेदवार पराभूत होतील, असा टोला नवनीत राणा यांनी हाणला आहे.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आहे. गरज पडल्यास ओवेसींच्या उमेदवाराविरोधात मी प्रचार सभा घेईल, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. एमआयएमने अमरावतीतून आपला उमेदवार उभा केल्यास त्याचे डिपॉझिट जप्त करू, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.
नाशिकच्या येवला शहरातील मेन रोडवरील एका कपड्याच्या दुकानाला शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देशातील राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद होणार आहे. या पत्रकारपरिषदेत लोकसभा निवडणूक 2024 तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.