राहुलजींच्या यात्रेचे स्वागत.महाराष्ट्रावर होणा-या अन्यायाविरोधात मविआ ठामपणे उभी आहे.
इलेक्ट्रॉल बाँड व पेटीएमचे फेल्युअर दिसतंय. हे कव्हर करण्यासाठी सीएए आणले जातंय. नोटाबंदीवेळी पेटीएमचा बोलबाला केला जातोय. यामध्ये गरिबांचा पैसा आहे.
लोकशाही आहे. शिवतारेही लढू शकतात.
आमच्यातील संवाद चांगला आहे.
भाजपला नाव बदलून कंसात काँग्रेस असं नाव टाकावे लागेल
सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बॅक ऑफ इंडियाची याचिका फेटाळल्यानंतर आज बँकेने इलेक्टोरल बॉन्डची माहिती निवडणूक आयोगाला 5:30 वाजता सादर केल्याची माहिती
१५ मार्चला निवडणूक आयोगाला ही माहिती वेबसाईटवर अपलोड करावी लागणार
बिगर मराठी भाषिक मतदारांची मोठी संख्या असलेल्या मतदार संघातून पियुष गोयल निवडणुकीच्या मतदारसंघातून
मागील दोन टर्म पासून या मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी त्यांचे तिकिट कापले जाणार
देशात सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होणाऱ्या काही अव्वल लोकसभा जागांमध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ
राज्यातील भाजपाच्या 12 खासदारांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आहे. यावर कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.राज्याची कोर कमिटी ही केंद्राच्या कोर कमिटीला अहवाल देत असते.त्यावर निर्णय होत असतो.यावर संभाव्य उमेदवार कोण हे कोणीच सांगू शकत नाही.नांदेड लोकसभेचा उमेदवार कोण यावर देखील कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.नांदेड असो की देशातील लोकसभेच्या 543 जागांवर नरेंद्र मोदी हेच उमेदवार असतील असे मिश्किल उत्तर कपिल पाटील यांनी दिले.
मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप सरकार स्थापन करणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र काही तासातच नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
पालघरमध्ये जलजीवन मिशनच्या स्टॉक केलेल्या पाईपला भीषण आग लागली आहे. माहीम ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना घडली आहे . आगीत लाखो रुपयांचे पाईप जळून खाक झाले आहेत . आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ . ठेकेदारीवरून झालेल्या वादामुळे आग लावल्याचा संशय.
नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर?
माजी क्रीडा मंत्री व काँग्रेसचे नेते म्हणून वळवींची कामगीरी
पद्माकर वळवी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला
कार लिफ्टच काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू तर अन्य एक जखमी
कल्पना चावला चौक, सोनी वाडी बोरिवली येथील दुर्घटना
२२ मजली सोनी आर्केड इमारतीतील दुर्घटना
जखमी शताब्दी रुग्णालयात भर्ती
वसंत मोरे काही वेळात आपली भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार
वसंत मोरे यांच्या कात्रजमधील निवासस्थानी वसंत मोरे पत्रकार परिषद घेणार
निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
वसंत मोरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
गेले काही दिवसापासून वसंत मोरे मनसेमध्ये अस्वस्थ होते,नाराज होते
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार हे पाहावे लागणारे
काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नाशिक जिल्ह्यात दाखल होत असून,दुपारी तीन वाजता मालेगावमध्ये या यात्रेचे आगमन होणार आहे. राहुल यांच्या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून मालेगावमध्ये जय्यत तयारी करण्यात येत असून ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक व काँग्रेस पक्षाचे ध्वज लावण्यात आले आहेत. राहुल गांधी दुपारी 3 ते 5 या वेळात रोड शोद्वारे नागरिकांशी संवाद साधाणार आहे.तसेच जुना आग्रा रोड येथे चौक सभा घेऊन नागरिकांना संबोधित करणार आहे.
केद्रींय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला
वर्षा या शासकीय निवासस्थानी राणे भेटीला
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भेट
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
थोड्याच वेळात मुख्यमंत्री वर्षावर येणार
येत्या ३ ते ४ दिवसात लोकसभा निवडणूक लढायची की नाही याबाबत भुमिका स्पष्ट करेन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आढावा बैठकीत वक्तव्य
तुम्ही लोकांपर्यंत संपर्क वाढवा
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राजभवनात पोहोचले
हरयाणा मनोहरलाल खट्टर यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
राज्यपालांकडे सुपूर्त केला राजीना
महायुतीतील मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान दिलं जाणार
महायुतीत तीन मोठे पक्ष असल्याने जागा मिळवण्यात रस्सीखेच
लोकसभेच्या उमेदवारीत स्थान मिळणं कठीण
सध्याचे राहू द्या , विधानसभेत बघू, मित्रपक्षांना आश्वासन
कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण होणार हा दिल्लीचा निर्णय आहे
पक्ष जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे
माझ्या उमेदवारी बद्दलची चर्चा दिल्लीत ठरू दे गल्लीत याविषयी चर्चा करायला नको
वरती जे ठरेल त्याप्रमाणे आपण भविष्यकाळात काम करू
आपल्या लोकांची अशीच सेवा करण्याची संधी शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून मला मिळावी
भाजप नेते समरजीत घाडगे यांचे प्रतिपादन
महायुतीची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द
लोकसभा निवडणुका आणि जागावाटपावर होणार होती चर्चा
मात्र काल पाठोपाठ आजही ही बैठक रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती
या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार होते उपस्थित
यापुढील ही बैठक दोन ते तीन दिवसांनी होण्याची शक्यता
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी खुला
वरळी ते नरिमन पॉइंट अंतर अवघ्या १० मिनिटात होणार पार
देशातील पहिला सागरी बोगदा आजपासून खुला
प्रवासी वाहन तसेच बेस्ट बस करणार मार्गाचा वापर
वरळी बिंदू माधव ठाकरे चौक ते नरिमन पॉईंट ९.५ किलोमीटर लांब मार्ग वाहतुकीसाठी खुला
नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती मंदिराला राज्य शासनाकडून "अ" दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता
भोसले कालीन मंदिराला "अ" दर्जा देण्याची अनेक वर्षांची होती मागणी
फक्त नागपूरच नाही दूरवरून भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून टेकडी गणेशाची ओळख
पर्यटन मंत्रालयाने "अ" दर्जा दिल्याने मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुट मार्च
शहरातील विविध भागातून काढण्यात आला रुट मार्च
शहरात अनेकजण पोलीस विभागात बाहेरून येत असल्याने नवनियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांना परिसराची माहिती व्हावी, त्यांना शहराच्या वेगवेगळ्या भागाचा भौगोलिक भाग समजावा
त्याच प्रमाणे गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी आज नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.