PM Modi Pune Visit Speech: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं PM मोदींचा गौरव; मराठीतून केली भाषणाची सुरुवात

PM Modi News: या कार्यक्रमात बोलताना मोदींनी लोकमान्य टिळकांच्या कार्यांची जनतेला आठवण करुन दिली.
PM Modi Pune Visit Speech
PM Modi Pune Visit SpeechSaam TV
Published On

PM Modi Pune Visit Speech:

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकमान्य टिळक पुरस्काराने मोदींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी लोकमान्य टिळकांविषयीच्या कार्यांची जनतेला आठवण करुन दिली. तसेच उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली.

आजही लाल बाल पाल ही नावे त्री शक्तीसारखी जाणवतात

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी लाल बाल आणि पाल या तिन्ही नावांची आणि इंग्राजांच्या काळाची आठवण करुन दिली." स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजांनी टिळकांवर फार अन्याय केला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी टिळकांनी त्याग आणि बलिदानाची पाराकाष्टा केली. यावेळी त्यांच्यासोबत लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल यांच्यातील विश्वास भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण अध्याय आहे. आजही लाल बाल आणि पाल ही तिन्ही नावे त्री शक्तीच्या रुपाने आठवली जातात",असं यावेळी मोदी म्हणाले.

PM Modi Pune Visit Speech
Narendra Modi News | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, मेट्रोच्या मार्गांचं लोकार्पण होणार

भारतीय असंतोषाचे जनक

इंग्रजांना टिळकांना भारतीय अशांततेचे जनक (father of Indian unrest) म्हणावे लागले होते. आजही लोकमान्य टीळकांचे केसरी काही घरांमध्ये वाचले जाते. शिवजयंतीचे आयोजन भारतातील संस्कृतिला गुंफण्याचे आव्हान होते. टिळकांनी यातून समाजाला नवीन दिशा दाखवली. आजच्या तरुणाईसाठी ही मोठी शिकवण आहे, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊले

कोरोना काळात अनेक नागरिक दगावले. यावेळी महामारी रोखण्यासाठी आपण भारतीय लस बनवली. त्यात भारताचा महत्वाचा वाटा आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे आपलं पाऊल आहे. पूर्वी लहान सहान कामांसाठी लोकांना त्रास व्हायचा. आता वेगाने कामे होतात, त्यामुळे विश्वास वाढतोय. जग भारताकडे भविष्य म्हणून पाहत आहे. लोकमान्य टिळक आपल्याला पाहून आशिर्वाद देत असतील, असं मत यावेळी मोदींनी व्यक्त केलं.

PM Modi Pune Visit Speech
PM Modi Pune Visit Speech: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं PM मोदींचा गौरव; मराठीतून केली भाषणाची सुरुवात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com