अमरावती - काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिका आणि पोलीसांनी हटवला. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आज आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहे. त्यामुळे राजीनामे देतांना गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी (Police) अमरावती महानगरपालिके (Amravati Municipal Corporation) समोर मोठा बंदोबस्त लावला आहे. (Amravati Latest News)
हे देखील पहा -
तसंच लहुजी शक्तिसेनेने शनिवारी मध्यरात्री अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या मार्गावरील दुभाजकाच्या अगदी समोर असलेल्या एका प्रतिकृतीजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला होता. प्रशासनाला याची माहिती मिळताच तो पुतळा काही तासातच पहाटे काढून टाकण्यात आला. या कारवाईमुळे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ते महापालिके बाहेर निदर्शन करणार आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.