नारायण राणे यांच्यासह राज्याचे तीन नेते घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

२०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायण राणे यांच्यासह राज्याचे तीन  नेते घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
नारायण राणे यांच्यासह राज्याचे तीन नेते घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ Saam tv
Published On

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. 2019 मध्ये दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींच्या मंत्रीमंडळातील हा पहिला सर्वात मोठा विस्तार आहे. सायंकाळी सहा वाजता हा विस्तार होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चार नेत्यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, भरती पवार आणि भागवत कराड यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. (Three state leaders, including Narayan Rane, will be sworn in as Union Ministers)

२०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने ही रणनीती आखलेली दिसत आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री असून विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या 81 वर जाऊ शकते.

नारायण राणे यांच्यासह राज्याचे तीन  नेते घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
13 वकील, सहा डॉक्टर, पाच अभियंते; असे असेल मोदींचे मंत्रिमंडळ

केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान निश्चित झालेले कोण आहेत कपिल पाटील

भिवंडी तहसीलच्या दिवे अंजूर गावच्या सरपंचपदावरून कपिल पाटील यांनी राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांव्यतिरिक्त त्यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. भिवंडी हे 2014 ते 2019 या काळात लोकसभेचे खासदारही होते.

- कपिल पाटील यांचा भाजपाला काय फायदा?

कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपिल पाटील हे देखील भाजपचे ओबीसी चेहरा असून ते आगरी समाजातून आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून डीबी पाटील करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीवरही समाज आक्रमक झाला आहे. या समाजातील नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप आता शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल.

- कपिल पाटील यांचे राजकीय जीवन

जन्म- 5 मार्च 1961

जन्मस्थान-भिवंडी

शिक्षण- बीए (मुंबई विद्यापीठ)

सरपंच- 1988- 1992 (ग्रामपंचायत डाईव अंजूर)

सदस्य- 1992- 1996 (पंचायत समिती भिवंडी)

अध्यक्ष- 1997 ((पंचायत समिती भिवंडी)

सदस्य- 2002 -2007 (जिल्हा परिषद ठाणे)

अध्यक्ष-2005- 2007 (जिल्हा परिषद कृषी समिती)

अध्यक्ष - 2009 - 2012 (जिल्हा परिषद ठाणे)

अध्यक्ष- ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

- भागवत कराड

डॉ. भागवत कराड हे एक निष्णात बालरोग शल्यचिकित्सक आहेत. डॉ. कराड हे शांत, संयमी नेते आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे. पेशाने डॉक्टर असल्याने त्यांना राजकारणात 1995 साली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली . 1995 च्या महानगरपालिका निवडणुकीत ते अपक्ष म्हणून म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले. त्यांचे दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिंब्याने ते दोनवेळा औरंगाबादचे महापौर झाले. त्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही त्यांनी खंबीर साथ दिली. 2015 मध्ये त्यांनी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. या अध्यक्ष पदावर असताना त्यांनी मराठवाड्याचे विकास प्रश्न मांडून मोठी चर्चा घडवून आणली.

नारायण राणे यांच्यासह राज्याचे तीन  नेते घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप; कोट्यवधीचा भ्रष्टाचार ?

- कोण आहेत भारती पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती ए. टी पवार यांच्या भरती पवार या स्नुषा (सूनबाई) आहेत. भारती पवार यांनी 5 जुलै 2019मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मते मिळवली. त्या २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या. आदिवासी बहुल भागात भारती पवार यांचे मोठे वर्चस्व आहे. उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर आणि एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून भारती पवार यांची ओळख आहे.

- कोण आहेत भारती पवार?

भारती पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावरून त्यांनी लाखो मते मिळवली.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांनी कार्यकर्त्यांचं मोठं जाळं

त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं

संघटन कौशल्याच्या बळावर आणि भाजपच्या मदतीने दिंडोरीत ताकद वर्चस्व वाढले

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com