पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप; कोट्यवधीचा भ्रष्टाचार ?

स्वस्त धान्य पुरवठा विभागाच्या गोदामात निकृष्ट धान्याचा पुरवठा होत आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप; कोट्यवधीचा भ्रष्टाचार ?
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप; कोट्यवधीचा भ्रष्टाचार ? Saam Tv

संजय डाफ

नागपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत Pradhan Mantri Garib Kalyan Yojana देण्यात येणारे धान्य निकृष्ट असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आल आहे. दारिद्रय रेषेखालील लोकांना मोफत धान्य दिलं जात असते. मात्र, नागपूरात जनावरं सुद्धा खाणार नाही असं या गरिबांना दिलं जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नागपूरच्या रेशन Ration धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ Rice निकृष्ट आहे. Distribution of inferior foodgrains under the Prime Minister's Poor Welfare Scheme

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सध्या दारिद्र रेषेखालील लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे. यात तांदूळ, गहू आणि डाळीचा समावेश आहे. मात्र, मोफत धान्य देण्याच्या नावावर गरिबांची थट्टा केली जात आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य गरिबांना दिलं जात आहे. तांदळामध्ये 20 टक्के कनक्या (तुटलेला तांदूळ) मिक्स केलेला चालतो.

हे देखील पहा-

मात्र, या तांदळात 60 टक्क्यांपेक्षा अधिक कनक्या मिसळविल्या जात आहेत. त्यातही तांदळाचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळं यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार Corruption असल्याचा आरोप रेशन दुकानदार संघटनेने केला आहे. Distribution of inferior foodgrains under the Prime Minister's Poor Welfare Scheme

दरम्यान यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकऱ्यांना विचारणा केल्यावर सध्या पोटनिवडणुकीची जबाबदारी आहे. यावर बोलता येणार नाही. निकृष्ट तांदळाचं आम्ही बघून घेऊ असं उत्तर दिलं गेलं. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bavankule यांनी यात मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सीबीआय CBI मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप; कोट्यवधीचा भ्रष्टाचार ?
अकोला बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद; करोडोंचे व्यवहार ठप्प

या निकृष्ट तांदळामुळं रेशनच्या धान्यात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याची बाब पुढं आली आहे. हे घोळ संपूर्ण राज्यात State आहे. त्यामुळं स्वतः मुख्यमंत्र्यांनी CM याची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून गरिबांना निकृष्ट धान्य खायला देणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com