Wardha News: टिप्परला भरधाव दुचाकी धडकली, मदतीसाठी थांबलेल्या कारला दुसऱ्या टिप्परने चिरडले; तिघांचा मृत्यू

Wardha Accident News: वर्ध्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर उभे असलेल्या टिप्परला मागाहून येणारी दुचाकी धडकल्याची घटना घडली आहे.
Wardha Accident News
Wardha Accident NewsSaam Tv

>> चेतन व्यास, वर्धा

Wardha Accident News:

वर्ध्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर उभे असलेल्या टिप्परला मागाहून येणारी दुचाकी धडकल्याची घटना घडली आहे. यानंतर दुचाकी चालकाच्या मदतीसाठी कार थांबली होती. यावेळी दुचाकी चालकाची मदत करण्यासाठी कारमधून उतरताच समोरुन भरधाव येणाऱ्या गिट्टी भरलेल्या टिप्परने कारला उडवले.

ही आघाताची घटना वडनेर ते शिरसगाव रस्त्यावर असलेल्या येरणगाव येथे घडली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha Accident News
Arvind Kejriwal: 'अटक आणि रिमांड दोन्ही बेकायदेशीर, तात्काळ सुटका करा', केजरीवाल यांची हायकोर्टात धाव

जखमींना वडनेर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विजय देवतळे (४५), अक्षय कोलकडे (२५) दोन्ही रा. येरणगाव, राहुल नैताम (२७ रा. अलमडोह) अशी मृतकांची नावे आहे. तर रतन पचारे (रा. कात्री) आणि अर्जुन मोरे (३५) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर ते शिरसगाव रस्त्यावर सुरकार यांच्या शेताजवळ एक टिप्पर सकाळपासूनच नादुरुस्त स्थितीत उभा होता. दरम्यान, मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीचालकास टिप्पर न दिसल्याने दुचाकी धडकली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. जखमी दुचाकीस्वाराची मदत करण्यासाठी शिरसगावकडून येणारी एक कार थांबली.

Wardha Accident News
Sangli Lok Sabha: सांगलीत ठाकरे गट-काँग्रेस आमनेसामने? सतेज पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं यांचं नाव घेत केलं मोठं वक्तव्य

कारमधून काही जण उतरले आणि जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले. जखमीला कारमध्ये बसवत असतानाच वडनेरकडून भरधाव येणाऱ्या गिट्टी भरुन असलेल्या टिप्परचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून कारला चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com