Pune Accident News : तळेगाव ढमढेरेनजीक भीषण अपघात दाेन महिलांसह युवक ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

यावेळी घटनास्थळी माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली.
talegaon dhamdhere accident news
talegaon dhamdhere accident newssaam tv

Pune News : पुणे जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे जवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

talegaon dhamdhere accident news
Maratha Andolan : ...म्हणून मराठा तरुणांचा संयम सुटला : बाळासाहेब थाेरात, उद्यापासून काेपर्डी ग्रामस्थांचे उपाेषण

याबाबतची मिळालेली माहिती अशी - माल वाहतुक गाडी आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

talegaon dhamdhere accident news
Maratha Aarakshan : नेमकं मराठा समाजाला बदनाम काेणाला करायचे आहे? नितेश राणे

पाेलिसांनी आणि घटनास्थळावरुन दिलेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये अनिता बोरुडे, योगिता बोरुडे आणि राजू शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या अपघातात कारमधील एक 17 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान माल वाहतुकीमधील दोन जणांची देखील चिंताजनक असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com