सोलापुरात एकाचवेळी निघाली 3 मित्रांची अंत्ययात्रा; राऊतांना भेटण्यासाठी जाताना घडली दुर्दैवी घटना

मयत तरुण हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते, तीघांच्याही अंत्ययात्रेसाठी सोलापुरात मोठी गर्दी झाली आहे.
सोलापुरात एकाचवेळी निघाली 3 मित्रांची अंत्ययात्रा; राऊतांना भेटण्यासाठी जाताना घडली दुर्दैवी घटना
सोलापुरात एकाचवेळी निघाली 3 मित्रांची अंत्ययात्रा; राऊतांना भेटण्यासाठी जाताना घडली दुर्दैवी घटनाविश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरमधील (Solapur) तीन मित्र उर्जामंत्री नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना अपघात (Accident) झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काल सोलापुरतील तीन तरुण नितीन राऊचांना भेटण्यासाठी जात असताना मुंबई-पुणे हायवेवरील (Mumbai-Pune Highway) खोपोलीजवळ त्यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरू या तीन मित्रांचा मृत्यू झाला.

सोलापुरात एकाचवेळी निघाली 3 मित्रांची अंत्ययात्रा; राऊतांना भेटण्यासाठी जाताना घडली दुर्दैवी घटना
Shivsena: उंडाळकर काकांना टक्कर देणारा सेनेचा लढवय्या हरपला; अशाेक भावकेंचे अपघाती निधन

मयत तरुण हे काँग्रेस (Congress) पक्षाशी संबंधित होते. दरम्यान या तीघांच्याही अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी झाली आहे, या तीघांवरतीही सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत एकाचवेळी अंतिमसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान या तीन तीघांच्या मृतदेहाच सुशीलकुमार शिंदे, आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल खालापूरात अंत्यदर्शन घेतलं होत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com