नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एकाचा साप चावल्याने, दुसऱ्याचा जळून तर तिसऱ्या घटनेत विष प्राशन केल्याने मृत्यू झाला. या घटनांच्या आकस्मिक मृत्यूच्या नोंदी विविध पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. Three- death- in- different -incidents- in- Nanded- district
याबाबत अधिक माहिती अशी की, मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथे राहणारा शेतकरी अरुण बालाजीराव पाटील ( वय ३५ ) हा ता. २२ जुलै रोजी आपल्या शेतात काम करत होता. यावेळी त्यांना विषारी सापाने चावा घेतला. जखमी अवस्थेत त्यांना हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा ता. २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची दत्तात्रय बालाजीराव पाटील यांच्या माहितीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक नरेंद्र यालावार करत आहेत.
दुसऱ्या घटनेत आमगव्हाण, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील सायली राजेश्वर सूर्यवंशी (वय १४) ही गॅसवर स्वयंपाक करीत असताना ता. २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गॅसचा भडका झाल्याने तिच्या अंगावरील कपडे पेटले. यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. तिला सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय पोलिस चौकीचे अंमलदार डब्ल्यू. के. कांबळे यांनी पाठवलेल्या कागदपत्रांनुसार हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक श्री सातपुते करत आहेत.
तर तिसऱ्या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील अंधारी येथील सुभाष सटवाजी वाघमारे ( वय ३८) या शेतकऱ्याने कुठल्यातरी कारणावरुन विष प्राशन केल्याने त्याला भोकर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ही घटना ता. २५ जुलैच्या दुपारी एकच्या सुमारास घडली. पोलिस हवालदार आर. बी. राठोड यांच्या माहितीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार श्री. कदम करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.