मंगेश भांडेकर
गडचिरोली : महाराष्ट्रात पोलीस भरतीची घोषणा झाल्यानंतर तरुणांनी कंबर कसायला सुरुवात केलीय. कोरोळा काळात पोलीस भरती प्रक्रिया (Police Recruitment in Maharashtra) रखडल्याने तरुणांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. परंतु, आता गडचिरोली जिल्हा पोलीस दलाची भरती प्रकिया सुरु झाल्याने उमेदवार जोरदार तयारीला लागला आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या १३६ जागांसाठी उद्यापासून (Physical test) तीन दिवस शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणीसाठी जिल्हा पोलीस दलाचे मैदान सज्ज असून एका जागेसाठी १२ प्रमाणे १६३२ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.
त्यामुळे आजपासूनच ग्रामीण भागातील उमेदवार गडचिरोलीत (Gadchiroli) दाखल झाले आहेत. लेखी परीक्षा यापूर्वी घेण्यात आली आहे. तब्बल १७ हजाराहून अधिक उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले होते. यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर करून एका जागेला १२ प्रमाणे १६३२ उमेदवारांना तीन दिवस शारीरिक चाचणीसाठी बोलावले आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून जिल्हा पोलीस दलाच्या मैदानावर गोळा फेक, १०० मीटर धावणे, पाचशे मीटर धावणे, लांब उडी अशा विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस दलाने मोठा बंदोबस्त लावला असून उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून आपत्कालीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भरती प्रक्रियेला सामोरे जावे,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.