अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली

नदीतून युवकं करताहेत दुध वाटप
अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली
अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली संतोष जोशी
Published On

नांदेड - जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने Heavy rain अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहे. नायगाव Naigaon तालुक्यात तर पुर परिस्थिती गंभीर बनली आहे. पुर परिस्थितीचे दृश्य छायाचित्रकार भगवान शेवाळे ड्रोन कॅमेऱ्या द्वारे टीपले आहेत. नदी नाले, रस्ते जल मय झाले आहेत. तर अनेक घरं पाण्याखाली गेली आहे. पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलेली पिके डोळ्यासमोर वाहून गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी farmer हवालदिल झाला आहे.

त्यातच बरबडा परिसरातील शेतजमिनीत पावसाचे पाणी शिरले आहे. यंदा सोयाबीनला उच्चांकी भाव असल्याने मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला आर्थिक हिशोब पक्का लावून ठेवला होता. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भयावह वास्तविकता दाखवणारी ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानी टिपली आहेत.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे याच अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात दुध उत्पादक जिव धोक्यात टाकून चक्क दुध वाटप करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील गुरफळी गावचे हे शेतकरी गेल्या चार दिवसांपासून नदीपात्रातून जिव धोक्यात टाकून पोहत प्रवास करत शहराच्या दुध वाटप करत आहेत.

अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली
बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटणा आक्रमक

पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते, जलमय झाले असून हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांचा अद्याप संपर्क तुटलेला आहे. अशा स्थितीत गुरफळी गावातील दूध उत्पादक शेतकरी पाण्यातून मार्ग काढत आहेत. जिवनावश्यक असलेल्या दुधाचा पुरवठा थांबू नये यासाठी गुरफळी इथल्या युवकांचे हे धाडस जिवावर बेतू नये हीच अपेक्षा.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com