बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटणा आक्रमक

अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्गावर सावळेश्वर - पैठण मध्ये तब्बल 2 तास रास्ता रोको...
बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटणा आक्रमक
बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटणा आक्रमकविनोद जिरे
Published On

बीड - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे Farmer अतोनात नुकसान Damage झाले आहे. शेतातील पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत, तर गोठ्यात बांधलेले जनावरे देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांपुढे जागाव कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई Compensation द्यावी, ही मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghatana आक्रमक झाली आहे. पूरग्रस्त सावळेश्वर पैठण Paithan या गावात अंबाजोगाई - कळंब हा राज्य महामार्ग अडवून रस्ता रोको करण्यात आला.

हे देखील पहा -

यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, गतवर्षीचा 2020 चा थकीत खरिप पीकविमा तात्काळ वाटप करावा, पुराने ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी, चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून 25% अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करुन 100% पीकविमा मंजूर करावा.

बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटणा आक्रमक
झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ 100 टक्के लसवंत...

यासह विविध मागण्यांसाठी बीडच्या सावळेश्वर पैठण या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तब्बल दोन तास रास्ता रोको केला आहे. दरम्यान मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com