नाशिकमध्ये खळबळ! कुत्र्याला गुंगीचं औषध, चिमुकल्याच्या डोक्यावर लावली बंदूक, चोरट्यांनी टाकला सशस्त्र दरोडा

नाशिक येथील दिंडोरी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे.
Robbery in Nashik
Robbery in NashikSaam TV

नाशिक: येथील दिंडोरी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे. ढकांबेमध्ये मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी (Armed robbery) दरोडा टाकून तब्बल तीस लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लुटला. यामध्ये 30 तोळे सोनं आणि 15 लाखांच्या रक्कमेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. घरातील लहान मुलाच्या डोक्याला बंदूक लावून चोरट्यांनी डल्ला मारला. तसेच कुत्र्याला गुंगीचे औषध देऊन चोरटे घरात घुसले आणि मुद्देमाल लंपास केला. (Armed robbery in nashik police investigation going on)

Robbery in Nashik
Breaking: पुण्यात दुहेरी हत्याकांड! नगरसेवकाच्या घरासमोर धारदार शस्त्राने दोघांची निर्घृण हत्या

या गंभीर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ढकांबे गावातील रतन बोडके यांच्या घरावर चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ढकांबे गावात सशस्त्र दरोडा टाकला. तब्बल तीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला. घरातील लहान मुलाल बंदुकीचा धाक दाखवून आणि कुत्र्याला गुंगीचं औषध देऊन चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com