Nashik Ganpati Temple Theft Video: नाशिकच्या चांदीचा गणपती मंदिरात चोरीचा थरार! धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Theft at Nashik's Silver Ganpati Temple: पाठलाग करणाऱ्या पोलिसांपासून वाचण्यासाठी या चोरट्याने थेट गोदावरी नदी पात्रात उडी घेतली.
Nashik Ganpati Temple Theft Video
Nashik Ganpati Temple Theft VideoSAAM TV

Nashik Chandicha Ganpati Mandir Chori CCTV Footage: नाशिकच्या प्रसिद्ध चांदीचा गणपती मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. रॉड घेऊन आलेल्या चोराने मंदिराच्या सुरक्षा रक्षकाला रॉडने मारहाण करत मंदिराच्या दरवाजाची काच फोडून गणेश मूर्तीवरील दागिणे चोरले आणि तेथून पळ काढला. हा चोरीचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

रविवार कारंजा येथील सिध्दीविनायक गणेश मंदिर म्हणजेच चांदीचा गणपती मंदिरात पहाटेच्या सुमारास मंदिरात गर्दी नसल्याचे पाहून चोरट्याने रॉड घेऊन प्रवेश केला आणि थेट मंदिराच्या दरवाजाची काच फोडण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने सुरक्षा रक्षकाला रॉडने बेदम मारहाण केली.

Nashik Ganpati Temple Theft Video
Youth Falls From Train: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यानची घटना

या मारहणीमुळे सुरक्षा रक्षक जमीनीवर कोसळा. त्यानंतर या चोरट्याने रॉडच्या साह्यायने गणपती मंदिरातील गाभाऱ्याची काच फोडली आणि गणेश मूर्तीवरील ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने ओरबाडून तेथून पळ काढला. रविवारी पहाटे 2.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

जखमी सुरक्षारक्षकांने या घटनेनंतर आरडाओरडा केला. याबाबत कळताच पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी चोराचा पाठलाग केला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांपासून वाचण्यासाठी या चोरट्याने थेट गोदावरी नदी पात्रात उडी घेतली. परंतु स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी चोरट्याला गजाआड केले. (Nashik Crime News)

Nashik Ganpati Temple Theft Video
Shiv Sena Crisis: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आज दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार?

दरम्यान नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातवरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com